Manasvi Choudhary
सकाळी उठल्यावर आपण जे पहिले पदार्थ खातो, त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. यानुसार सकाळी उठल्यानंतर काय खाऊ नये हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
रिकाम्यापोटी चहा/कॉफी घेतल्याने हायड्रोक्लोरिक ॲसिड वाढते, ज्यामुळे ॲसिडिटी आणि छातीत जळजळ होऊ शकते.
संत्री, मोसंबी किंवा द्राक्षे रिकाम्यापोटी खाल्ल्याने पोटातील आम्ल वाढून उलट्या किंवा जुलाब होऊ शकतात.
सकाळी मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटाला त्रास होतो . दिवसभर अस्वस्थ वाटू शकते.
फ्रिजमधील थंड पाणी किंवा कोल्ड ड्रिंक्स प्यायल्याने पचनक्रिया मंदावते. नेहमी कोमट पाण्याचा वापर करा.
सलाड आरोग्यदायी असले तरी रिकाम्यापोटी कच्च्या भाज्यांमधील फायबर पचवणे पोटासाठी जड जाऊ शकते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.