Manasvi Choudhary
हिवाळ्यात थंडीच्या दिवसात तुम्ही गरमागरम मेथीची पुरी संध्याकाळी नाश्त्याला बनवू शकता.
मेथी पुरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे तुम्ही घरीच सहजपणे मेथी पुरी बनवू शकता.
मेथी पुरी बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, मेथी, बेसन, ओवा, तीळ, हळद, मसाला, मीठ आणि तेल हे साहित्य एकत्र घ्यायचे आहे.
सर्वातआधी एका परातीमध्ये गव्हाचे पीठ, बेसन, मेथी आणि सर्व मसाले एकत्र करा. त्यात तेल मिक्स करा
या मिश्रणात थोडे पाणी मिक्स करून घट्ट पीठ मळून घ्या. नंतर पीठ झाकून ठेवा.
नंतर या मिश्रणाच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्या. या पुऱ्या जास्त पातळ लाटू नका.
गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये पुऱ्या मध्यम आचेवर तळून घ्या.