Shreya Maskar
तळगड किल्ला हा रायगड जिल्ह्यातील रोहाजवळ असलेला एक महत्त्वाचा ऐतिहासिक गिरीदुर्ग (डोंगरावरचा किल्ला) आहे. तळगड किल्ल्याला मोठा ऐतिहासिक वारसा आहे.
तळगड किल्ला हा कुंडलिका नदी समुद्राला जेथे मिळते त्या मांदाड खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला होता.ज्यामुळे हा प्राचीन व्यापारी मार्ग आणि सिद्दींच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होत होती.
तळगड किल्ल्यावर नक्कीच ट्रेकिंग करता येते. हा ट्रेक सोपा असून नवशिक्यांसाठीही उत्तम आहे. येथे तटबंदी, बुरुज आणि कुडा लेणी पाहायला मिळतात.
तळगड किल्ल्यावर हनुमान दरवाजा, पाण्याची टाकी, काही मंदिरांचे अवशेष पाहायला मिळतात.
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६४८ मध्ये आदिलशाहीकडून तळगड किल्ला जिंकून घेतला होता. तळगडच्या माथ्यावरून घोसाळगड, मुरुड आणि आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य दिसते.
तळगड किल्ल्यावरून घोसाळगड किल्ल्याचे सुंदर नजारा पाहायला मिळतो. हे दोन्ही किल्ले एकमेकांना पूरक आहेत. कारण ते एकाच व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी बांधले गेले होते.
तळगड किल्ल्यातून शिवकालीन स्थापत्यशैलीचे दर्शन घडते. ज्यात संरक्षणात्मक दरवाजे, गुप्त मार्ग आणि टेहळणीचे बांधकाम पाहायला मिळतात. हा किल्ला लष्करी आणि रणनीतिक गरजेनुसार बांधलेले होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.