Tasty Paratha Recipe yandex
लाईफस्टाईल

Tasty Paratha Recipe: गरमागरम चुरचुरीत ऑनियन चीज पराठा रेसिपी मराठी

Onion cheese paratha recipe in marathi: पराठा हा सगळ्यांच्या आवडीचा पौष्टीक नाश्ता असतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पराठा म्हटलं की तो बटाट्याचाच असतो, असे सगळ्यांच्या पक्के डोक्यात पक्के झाले आहे. पण पराठ्यातून बटाट्याची गच्छंती करुन त्यात चीज, पनीर, रवा, दुध, मेथी, पालकची पाने इत्यादींचा समावेश करुन नवीन पदार्थ तयार करु शकतो, असा आपण विचार करत नाही. आपण चीजचा समावेश असलेले पदार्थ बाहेरुन विकत घेवून खातो. त्याऐवजी तुम्ही घरी सुद्धा हे पदार्थ तयार करु शकता.

आता ऑक्टोबर महिना संपणार आहे. पुढे काहीच दिवसात हिवाळ्याचे आगमन होणार आहे. तेव्हा गरमागरम आणि चुरचुरीत पदार्थ आपल्या ताटात असतील तर दोन घास जरा जास्तच जातात. नेहमीच्या पराठ्यांपेक्षा एखादा वेगळा पराठा आपण कायमच तयार करतो. चला तर असाच एक वेगळा टेस्टी ऑनियन चीज पराठा तयार करुया.

चीज पराठ्याचे साहित्य:

४ मध्यम आकाराचे कांदे (बारिक चिरलेले)

१ वाटी चिरलेली कोथिंबीर

३ चिरलेल्या हिरव्या मिरच्या

१ मोठी वाटी चीजचा कीस

१ चमचा धणे-जिरे पावडर

२ चमचे लाल तिखट

अर्धा चमचा हळद

चिमुटभर ओवा

मीठ

तेल/तुप

तयार कणीक

कृती

सर्वप्रथम कणीक व्यवस्थित घट्ट मळून घ्या. कणीक मळून झाल्यावर त्यावर तेल लावा आणि एका ओल्या फडक्यात कणीक झाकून ठेवा. आता कांद्याचे पातळ काप करुन घ्या. कांदा एका प्लेटमध्ये ठेवा. त्यावर मीठ, हळद, लाल तिखट, धणे पावडर, जिरे पावडर, ओवा, कोथिंबीर, चिरलेल्या मिरच्या आणि सगळ्यात शेवटी चीज हे जिन्नस एकत्र करुन घ्या.

आता कणीक घ्या. त्याचा चपातीसारखा गोळा घ्या. त्या गोळ्यात तयार सारण भरा. आता हलक्या हाताने पराठा लाटून घ्यावा. गरम तव्यावर तुप घालून तो पराठा दोन्ही बाजुंनी चांगला शेकवा. गॅस स्लोच असु द्या नाहीतर कांदा जळू शकतो. अशा प्रकारे तुम्ही रमागरम आणि चुरचुरीत चीज पराठा तयार करु शकता.

Written By: Sakshi Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

Phone Charging: फोन चार्ज करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा आग लागू शकते

Maharashtra Politics : ठाकरेंना रोखण्यासाठी फिल्डिंग? एकनाथ शिंदेंचा अमित शाहांपुढे सीएमपदाचा प्रस्ताव?

SCROLL FOR NEXT