दिवाळी आता काहीच दिवसांवर आली आहे. त्यात फटाके, नवे कपडे, दागदागिने या सगळ्या गोष्टी घरात आल्या की, दिवाळी आल्यासारखे वाटते. आणखी एक महत्वाचा पदार्थ म्हणजे फराळ. फराळ खाल्याशिवाय कोणाचीच दिवाळी जात नाही. मग त्यात गोड शंकरपाळ्या, करंज्या किंवा तिखट पोह्यांचा चिवडा याचा समावेश असतो.
मात्र या सगळ्याचा परिणाम तुमच्या शरीरावर दिसू शकतो. सध्या काही लोक बाहेरुन फराळ विकत आणतात. त्यात साखरेचे प्रमाण आणि तेलाचे प्रमाण जास्त असते. त्याने तुमचे वजन झटक्यात वाढू शकते.
जर तुम्ही फराळ प्रेमी असाल तर, दिवाळीच्या आधीचं वजन कमी करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. त्याने दिवाळीत तुम्ही फराळ खावू शकता. तुमचे आवडीचे पदार्थ खावू शकता. यासाठी तुम्ही पुढील पद्धतीचा वापर करु शकता. तुम्ही तुमचे वजन काहीच दिवसात कमी करु शकता.
पांढऱ्या रंगाचे खाद्यपदार्थ खाणे टाळा.
साखर, मैदा, मीठ , लस्सी यांसारख्या पदार्थांचे सेवन करणे टाळा. खाद्यपदार्थात या गोष्टींचा समावेश करु नका. वरील पदार्थ खाल्याने तुमच्या वजनात भर पडेल. हे पदार्थ खाल्याने तुमचे वजन वाढेल. त्यात तुम्ही दिवाळीत सुद्धा फराळ खाल्ले तर तुमचे वजन जास्त वाढेल. त्यामुळे आत्ताच या गोष्टींचे सेवन करणे टाळा.
रोज व्यायाम करा.
तुम्ही वजन कमी करण्यासाठी व्यायाम केला तर तुम्हाला जास्त फायदा होवू शकतो. खाण्याबरोबर शरीराची काळजी घेणे महत्वाचे आहे. त्यासाठी दिवसातुन किमान ३० ते ४० मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे. त्यात तुम्ही धावणे, पळणे, चालणे, योगा करणे अश्या प्रकारचा समावेश व्यायामात करु शकता. तुम्ही जर दिवसाला १० हजार पाऊले चाललात तरीही तुमचे वजन झपाट्याने कमी होवू शकते.
जेवणात काही बदल करा
तुम्ही वजन कमी करण्यासाठी खाणे टाळू नका. त्याऐवजी तुम्ही घरगुती जेवणाचा समावेश आहारात करा. त्यात रात्री जेवण करताना आहारात हलक्या पदार्थांचा समावेश करा. लापशी, खिचडी, सुप किंवा सॅलेटचा समावेश तुम्ही करु शकता. याने तुम्ही झोपल्यावर तुमच्या शरीरात जास्त फॅट जमा होणार नाही. त्याचसोबत तुम्ही दिवाळीच्या आधी तेल न घातलेले पदार्थ खाल्ले पाहिजे. तुम्ही जर तेलकट पदार्थ खाल्लेत तर तुम्हाला दिवाळीतला फराळ खाणे टाळावे लागेल. तुम्ही आहारात फळे खाणे खूप फायदेशीर ठरु शकते. त्याने तुमचा फॅट वाढत नाही आणि तुम्हाला सतत भुक लागत नाही. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे वजन दिवाळीच्या अगोदर कमी करु शकता. सोबत फराळाचा आनंद लुटू शकता.
टीप: वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
Written By: Sakshi Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.