Ruchika Jadhav
वाढतं वजन कमी करण्यासाठी अनेक तरुणी वर्कआउटसह गोड पदार्थ आहारातून वगळतात.
डाएट फॉलो करताना साखरेचे पदार्थ आहारातून पूर्णता वगळले जातात.
गोड खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही साखर खाण्याऐवजी मधापासून बनवलेल्या काही डिश खाऊ शकता.
शेंगदाणे आणि मध एकत्र करून ही मिठाई खाल्ल्यास याने आरोग्याला अनेक गुणकारी फायदे मिळतात.
वजन कमी करताना हेवी प्रोटीन असलेले पदार्थ खाल्ले जातात. त्यामुळे तुम्ही चणे आणि मध एकत्र करून खाऊ शकता.
मधाप्रमाणे खजूरही एक गोड फळ आहे. ओली खजूर तुम्ही विविध पदार्थांमध्ये टाकून त्याची मिठाई बनवू शकता.
खजूरसह काळे मणूके सुद्धा चविला गोड लागतात. त्यामुळे तुम्ही मणूके आणि ड्राय फ्रूट्स एकत्र करून याचे गोड लाडू बनवू शकता.