Manasvi Choudhary
२५ डिसेंबरला सर्वत्र ख्रिसमस साजरा केला जाणार आहे. ख्रिसमसनिमित्त ऑफिस किंवा मित्रमैत्रिणींमध्ये सिक्रेट सॅन्टा खेळ खेळला जातो.
सिक्रेट सॅन्टा निमित्त तुम्ही ऑफिस महिला सहकाऱ्यांसाठी काय गिफ्ट्स घेऊ शकता याविषयी या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
आजकाल ऑफिस वेअरसाठी तुम्ही नाजूक आणि डेली वापरता येतील अश्या ज्वेलरी भेट देऊ शकता. यामध्ये ब्रेस्लेट, इअरिंग्स आणि रिंग याचा सेट देऊ शकता.
ऑफिस सहकारीसाठी तुम्ही तुमच्या आवडीच्या डिझाईनची बॅग भेट म्हणून देऊ शकता.
कॉफी मग हे सिक्रेट सॅन्टा गिफ्ट म्हणून तुम्ही देऊ शकता. या कॉफी मगवर तुम्ही तुमच्या सहकाऱ्याचे नाव देखील लिहू शकता.
फॅन्सी आणि ट्रेंडिग स्टाईलचे टॉप आणि साडी देखील तुम्ही भेट म्हणून देऊ शकता. तुमच्या आवडीच्या सहकाऱ्याचे नाव आले असेल तर हा चांगला पर्याय आहे.
ऑफिसच्या ताणतणावातून सुटका मिळवण्यासाठी सुगंधी मेणबत्ती, हँड क्रीम देखील देऊ शकता यामुळे तुमच्या सहकाऱ्याचा मूड फ्रेश राहील.