Saam Tv
हिंदू धर्मानुसार दरवर्षी कार्तिक अमानस्येला दिवाळी साजरी केली जाते.
यंदा ३१ ऑक्टोबर २०२४ ला दिवाळी साजरी केली जाणार आहे. त्यात लक्ष्मीला प्रचंड महत्वाचे स्थान आहे.
दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीची पाऊले आपल्या दारात लावली जातात. त्यावेळेस लक्ष्मीचे आगमन झाले असे मानले जाते.
जेव्हा लक्ष्मी घरात येते तेव्हा ती सुख-समृद्धी, धन आणि आनंद आपल्यासोबत आणते. म्हणून लक्ष्मीची पाऊले महत्वाची आहेत.
दिवाळीच्या दिवसात तुम्हाला बाजारातून लक्ष्मीची पाऊले विकत घ्या. ती पावले तुमच्या घरातील देवाऱ्याकडे वळतील अशा दिशेने लावा.
तुम्ही अशा पद्धतीने लक्ष्मीची पाऊले लावली की घरात सुख, पैसा, सकारात्मकता टिकून राहते.
तुम्ही लक्ष्मीची पावले विकत घेताना लाल, गुलाबी, पिवळे अशी विविध रंगांची पावले लावू शकता.
अनेक लोक सजावटीसाठी मुख्य दाराच्या मध्यभागी लक्ष्मीची पाऊले लावतात.
लक्ष्मी तुमच्यावर क्रोधित होवू शकते. याचे कारण म्हणजे दारात लक्ष्मीची पाऊले लावल्याने तुमचा पाय कळत नकळत त्यावर पडू शकतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.