ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शेवगा शेंगा हि घरगुती झटपट बनणारी पौष्टिक भाजी आहे. उन्हाळा आणि हिवाळा दोन्ही ऋतूत छान लागणारी पारंपरिक रेसिपी.
शेवगा शेंगा ,कांदा , हिरवी मिरची, लसूण ,मोहरी, जिरे, मसाले, हळद, मीठ आणि तेल इ. साहित्य लागते.
सुका शेवगाच्या शेंगा गरम पाण्यात 20 ते 30 मिनिटे भिजत ठेवा.यामुळे शेंगा मऊ होतात आणि चव छान लागते.
एक कढई घ्या.कढईत तेल गरम करून मोहरी व जिरे टाका. मोहरी तडतडल्यावर चिरलेला लसूण व हिरवी मिरची घाला.
चिरलेला कांदा घालून तो हलका सोनेरी होईपर्यंत परतवून घ्या. कांद्यामुळे भाजीला छान गोडसर चव येते.
आता हळद आणि मीठ घाला.हे थोडेसे परतून घेतल्यावर त्यावर गरम मसाले टाका चांगले परतवा म्हणजेच मसाल्यांचा कच्चेपणा जाऊ द्या.
आता तयार केलेल्या मसालामध्ये भिजवलेल्या शेवगाच्या शेंगा पिळून घाला.सर्व साहित्य नीट मिक्स करून 2 ते 3 मिनिटे परतवा.
थोडेसे पाणी शिंपडा वर झाकणावर थोडे पाणी टाकून 5 ते 7 मिनिटे भाजी वाफेवर शिजवून घ्या. भाजी सुकी पण मऊ झाली पाहिजे.
सुका शेवगाची शेंगाची भाजी गरमागरम भाकरी किंवा चपाती सोबत खूपच छान लागते.