ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ख्रिसमसला हमखास बनवला जाणारा सुगंधीत, मऊ आणि ड्रायफ्रुट्सने भरलेला घरगुती प्लम केक तुम्ही सुध्दा बनवून बघा. हा केक अतिशय सुंदर आणि सगळ्यांचा आवडता आहे.
मैदा, साखर, तेल किंवा बटर, दूध, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा,कोको पावडर, दालचिनी पावडर, जायफळ पावडर आणि ड्रायफ्रुट्स इ. साहित्य लागते.
तुमच्या अंदाजानुसार एका पॅनमध्ये १ किंवा २ कप साखर घ्या. साखर मंद आचेवर वितळवून घ्या. साखर ब्राऊन झाल्यावर त्यात ड्रायफ्रुट्स घालून हलके परतवून घ्या. यामुळे प्लम केकला खास रंग आणि चवही येते.
कॅरामेलमध्ये हळूहळू गरम दूध घाला यानंतर गाठी विरघळेपर्यंत नीट मिक्स करा. तयार केलेले मिश्रण थंड होऊ द्या.
एक भांड घ्या त्यात तेल, कॅरामेल दूध आणि साखर नीट मिक्स करा.व्हॅनिला घालून एकसारखे मिश्रण तयार करा.
उरलेले सगळे साहित्य चाळलेला मैदा, बेकिंग पावडर,कोको पावडर, सोडा, दालचिनी पावडर, जायफळ पावडर आणि ड्रायफ्रुट्स हळूहळू बॅटरमध्ये घाला. हे बॅटर एकाच दिशेने मिक्स करा.
कढईत मीठ घालून ५–७ मिनिटे गरम करा.केकच्या भांड्याला बटर लावून त्यात हे मिश्रण भरा. केक टिन ठेवून मध्यम आचेवर 40 ते 45 मिनिटे शिजवण्यास ठेवावा.
40 ते 45 मिनिटे झाल्यावर टुथपिक घालून तपासा. टुथपिक स्वच्छ बाहेर आला तर केक तयार आहे. केकपूर्ण थंड झाल्यावर टिनमधून बाहेर काढा.
केक छान सजवून त्यावर मेरी ख्रिसमसचा टॅग लावा . तसेच हा केक 2 ते 3 दिवस एअरटाइट डब्यात छान टिकतो.