OnePlus Nord 3 5G Saam Tv
लाईफस्टाईल

OnePlus चा 'हा' 5G फोन झाला स्वस्त, इंटरनेट वापरण्यासाठी मिळणार मोफत डेटा; जाणून घ्या काय आहे ओफर

साम टिव्ही ब्युरो

OnePlus Nord 3 5G Price: OnePlus फोन Amazon वर बंपर डिस्काउंटसह उपलब्ध आहे. या डीलमध्ये जिओ यूजर्ससाठी खास ऑफर आहे. Amazon ची ही ऑफर OnePlus Nord 3 5G वर दिली जात आहे. 16 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत 37,999 रुपये आहे.

एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन 31,750 रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतो. कंपनी युजर्सला 2,000 रुपयांचा अतिरिक्त एक्सचेंज बोनस देखील देत आहे. एक्सचेंज बोनस तुमच्या जुन्या फोनची स्थिती आणि ब्रँड यावर अवलंबून असेल.

एचडीएफसी बँकेच्या कार्डने पैसे पे करणाऱ्या युजर्सला 1,250 रुपयांपर्यंतची सूटही मिळेल. Jio युजर्सला हा फोन खरेदी केल्यावर वेगळा 4G/5G डेटा मिळेल. युजर्सला फोनमध्ये त्यांचा जिओ नंबर वापरावा लागेल आणि मोफत डेटासाठी 399 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅन घ्यावा लागेल. तुम्ही Amazon India च्या वेबसाइटवर ऑफरबद्दल अधिक तपशील पाहू शकता.  (Latest Marathi News)

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

कंपनी या फोनमध्ये 2772x1240 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.74-इंचाचा AMOLED डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले 120Hz पर्यंतच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोन 16GB पर्यंत LPDDR5x रॅम आणि 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेजसह येतो. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये Dimensity 9000 चिपसेट देत आहे.

फोटोग्राफीसाठी कंपनी या फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देत आहे. विशेष बाब म्हणजे फोनचा मुख्य कॅमेरा OIS म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन फीचरने सुसज्ज आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठी यात 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 80W SUPERVOOC चार्जिंगला सपोर्ट करते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT