Toyota Mirai Launch In India : वायू प्रदूषण ही जगभरातील देशांसह भारतसाठीही मोठी समस्या आहे. वाहनातून निघणाऱ्या कार्बन डायऑक्साइडमुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होतं. यावरच तोडगा काढण्यासाठी अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी देशात इलेक्ट्रिक वाहन लॉन्च करण्यास सुरुवात केली. ज्यामुळे वायू प्रदूषण कमी होण्यास काही प्रमाणात मदत होतं आहे. मात्र अजूनही देशात मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलवर धावणाऱ्या वाहनांची संख्या सर्वाधिक आहे.
अशातच प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी टोयोटा आपली MPV इन्होवा नविन रुपात लॉन्च करणार आहे. ही कार पूर्णपणे पर्यावरणपुरक आहे. पेट्रोल कारला पर्याय म्हणून याकडे पाहिले जात आहे. याचं कारण म्हणजे ही कार पेट्रोलवर नाही तर इथेनॉल इंधनावर धावते आहे.
टोयोटाची MPV इन्होवा लवकरच नव्या रुपात बाजारात येणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी ही नवीन इनोव्हा लॉन्च करणार आहे. ही टोयोटा इन्होवा पेट्रोलऐवजी इथेनॉलवर धावणार आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली.
२९ ऑगस्ट रोजी १०० टक्के इथेनॉलवर चालणारी नवीन इनोव्हा लॉन्च करणार आहेत. वाहन उत्पादकांनी इंधनाऐवजी पर्यायी इंधन आणि ग्रीन मोबिलिटीकडे वाटचाल करावी असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बऱ्याच दिवसांपासून सांगत आहेत.
गेल्या वर्षी नितीन गडकरींनी हायड्रोजनवर चालणारी टोयोटा मिराई कार लॉन्च केली होती. मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, "हे इंधन चांगले काम करू शकते आणि पेट्रोलियमच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात परकीय चलन वाचवू शकते. जर आपल्याला स्वावलंबी व्हायचे असेल, तर आपल्याला या तेल आयातीवर खर्च होणारी रक्कम शून्यावर आणावी लागेल, जी सध्या 16 लाख कोटींच्या आसपास आहे. हे अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान आहे."
इथेनॉल इंधनाचे फायदे
इथेनॉल इंधनाच्या वापराने पर्यावरणाला कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. तर वाहन चालकांच्या खिशावरचा भार कमी होईल. सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमत १०० रुपयांच्या आसपास आहेत. तर इथोनॉल ६३ ते ६५ रुपये प्रतिलीटर आहे. इथेनॉल पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत ४० रुपयांनी स्वस्त आहे. ते पेट्रोलच्या तुलनेत ५० टक्के कमी प्रदुषण पसरवते. पेट्रोलच्या तुलनेत इथेनॉलचे मायलेज कमी असते. त्यामुळे मोठी बचत होते.
पंतप्रधानांनी E20 इंधन लॉन्च केले
इथेनॉलच्या वापरासाठी सरकार नेहमी सातत्याने प्रोत्साहन देत असते. नितीन गडकरी जी कार लॉन्च करणार आहे ती पूर्णपणे इथेनॉलवर चालणार आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बेंगळुरुमध्ये E20 इंधन लॉन्च केले होते. जे २० % इथेनॉल आणि पेट्रोलचे मिश्रण आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.