सध्या सर्व जग ऑनलाईन झाले आहे. त्यामुळे प्रत्येकाकडे स्मार्टफोन हा असतोच. स्मार्टफोनमध्ये आयफोनचे नाव नेहमी अग्रेसर असते. अनेक लोक आयफोन घेण्यास प्रथम प्राधान्य देतात. आयफोन १५ प्रो लवकरच बाजारात येणार आहे.
आयफोन (iPhone) प्रीमीयम आणि महागड्या फोनपैकी एक आहे. सर्वांनाच आयफोन घ्यायचा असतो. अॅपल लवकरच आयफोन १५ ची सीरीज लॉन्च करणार आहे. एका रिपोर्टनुसार, नवीन आयफोन १५ सीरीज १४ सप्टेंबरला लॉन्च होईल. लॉन्च होण्यापूर्वी आयफोनबाबात काही माहिती समोर आली आहे.
आयफोन १५मध्ये नवीन रंगाचे पर्याय ग्राहकांना मिळणार आहेत. एका रिपोर्टनुसार, आयफोन १५ प्रोमध्ये गोल्ड कलर (Color) स्कीम नसणार आहे. या सीरीजमध्ये नवीन राखाडी रंग येणार आहे. ज्याला टायटन ग्रे असे म्हटले जाईल.
एका रिपोर्टनुसार, अॅपल कंपनी आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्सच्या गोल्ड रंगाला ग्रे रंगाने बदलणार आहे. त्यामुळे या फोनमध्ये ग्रे रंग पाहायला मिळणार आहे. आयफोन १५ चा रंग टायटन ग्रे रंगात येऊ शकतो. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. टायटन ग्रे रंग हा सिल्व्हर आणि पांढऱ्या रंगापेक्षा जास्त गडद आहे. तर स्पेस बंलॅक ग्रॅफाइटपेक्षा हलका आहे.
आयफोन १५ मध्ये जांभळ्या रंगाच्या जागी निळा रंग येऊ शकतो. अशा अफवा पसरत आहे. एका अहवालानुसार, आयफोन १५ मध्ये खास रंग असणार आहे. या रंगाबद्दल अधिकृत माहिती समोर आली नाही.
आयफोन १५ आणि आयफोन १५ प्रोमध्ये पाच रंगाचे पर्याय असल्याचे म्हटले जात आहे. यात निळा, काळा, पिवळा, हिरवा आणि गुलाबी रंगाचा समावेश असेल. आयफोन १५ सीरीजमध्ये (Series) यूएसबी टाइप-सी पोर्ट उपलब्ध असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.