iPhone 15 Launch Date : खुशखबर, आयफोन 15 या दिवशी होणार लॉन्च , किंमत जाणून तुम्हाला बसेल धक्का !

iPhone 15 Series Models Price Leaked : iPhone 15 या वर्षातील सर्वात लोकप्रिय लॉन्चपैकी एक असेल.
 iPhone 15 Launch Date
iPhone 15 Launch DateSaam Tv

iPhone 15 Series : iPhone 15 या वर्षातील सर्वात लोकप्रिय लॉन्चपैकी एक असेल. दरवर्षी अमेरिकन कंपनी Apple सप्टेंबर महिन्यात आपला नवीन iPhone लाँच करते. दरवर्षी अधिकृत लॉन्च होण्यापूर्वी फोनबद्दलचे अनेक तपशील लीक होतात. iPhone 15 बाबतही अनेक बातम्या समोर आल्या आहेत. त्याची लॉन्च तारीख, वैशिष्ट्ये आणि किमतीचे सर्व संभाव्य तपशील येथे जाणून घ्या.

iPhone 15 कधी लॉन्च होईल :

लीक्सनुसार, ही नवीन सीरीज यावर्षी 12 सप्टेंबर रोजी लॉन्च (Launch) होईल. मात्र, कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही. जोपर्यंत कंपनीकडून अधिकृत दुजोरा मिळत नाही, तोपर्यंत काहीही बोलणे योग्य ठरणार नाही. दरवर्षी प्रमाणे, अॅपलचा विशेष कार्यक्रम क्युपर्टिनो येथील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये होऊ शकतो.

 iPhone 15 Launch Date
iPhone 16 Pro Max Features : Apple ची मोबाईल फोटोग्राफी बदलणार, iPhone 16 Pro Maxमध्ये दिसणार ही जबरदस्त कॅमेरा सिस्टम

फीचर्स :

iPhone 15 मध्ये 6.1-इंचाचा लिक्विड रेटिना डिस्प्ले दिला जाण्याची अपेक्षा आहे. असे म्हटले जात आहे की त्याच्या सर्व मॉडेल्समध्ये डायनॅमिक आयलँड-स्टाईल डिस्प्ले असेल. गेल्या वर्षीपर्यंत ते प्रो मॉडेलपुरते मर्यादित होते. कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, आयफोन 15 पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या प्रोसेसरसह ऑफर केला जाऊ शकतो. असेही सांगितले जात आहे की या नवीन सीरिजमध्ये A16 बायोनिक चिपसेट दिला जाऊ शकतो.

कॅमेरा :

कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर, iPhone 15 मध्ये 48-मेगापिक्सेल इमेज सेन्सरसह डुअल रियर कॅमेरा (Camera) सेटअप दिला जाऊ शकतो. त्यात सॉफ्टवेअर अपग्रेडही दिले जाऊ शकते, असे मानले जात आहे. iPhone 15 वरून चांगल्या बॅटरी बॅकअपची अपेक्षा करू शकतो. या फोनमध्ये नवीन iOS सॉफ्टवेअर अपडेट दिले जाऊ शकते.

 iPhone 15 Launch Date
Flipkart Big Saving Days Sale : स्वस्तात खरेदी करा iPhone 14 आणि बरंच काही; 30 ते 40 हजार रुपयांची होईल बचत

किंमत :

जर आपण आयफोन (iPhone) 15 च्या किंमतीबद्दल बोललो तर लीक्सनुसार तो जवळपास $ 799 म्हणजेच 65,900 रुपये मध्ये उपलब्ध असेल, तर iPhone 15 प्लस $ 899 मध्ये उपलब्ध असेल म्हणजेच सुमारे 73,700 रुपये. या वेळी या सिरीजमध्ये येणारे प्रो मॉडेल्स मागील मालिकेच्या तुलनेत थोडे महाग असू शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com