Flipkart Big Saving Days Sale : स्वस्तात खरेदी करा iPhone 14 आणि बरंच काही; 30 ते 40 हजार रुपयांची होईल बचत

Big Saving Days Sale : फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलची घोषणा करण्यात आली आहे.
Flipkart Big Saving Days Sale
Flipkart Big Saving Days SaleSaam Tv
Published On

Flipkart Sale : फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलची घोषणा करण्यात आली आहे. हा सेल 15 जुलै 2023 पासून सुरू होणार आहे. या सेलमध्ये Apple iPhone 14 सह इतर अनेक स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट ऑफर देण्यात येणार आहे.

आयफोन 14 ची विक्री सर्वात कमी किमतीत खरेदी करता येईल अशी अपेक्षा आहे. त्याची किंमत 60,000-65,000 च्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. तुम्हाला स्मार्टफोन, टीव्हीसह कोणतेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस (Device) घ्यायचे असेल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे.

Flipkart Big Saving Days Sale
Amazon Prime Day Monsoon Sale: खुशखबर! 'अ‍ॅमेझॉन प्राइम सेल'मध्ये या 5 गोष्टींवर मिळतोय तगडा डिस्काउंट, खरेदीदारांची चांदी...

15 जुलैपासून Sale सुरू होईल

फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सेल 15 जुलैपासून चालू होणार असून 19 जुलैपर्यंत सुरू राहील. कंपनीने आगामी सेलची झलक दाखवण्यास सुरुवात केली आहे आणि त्यात iPhones वर सर्वाधिक फोकस आहे.

एका प्रमोशनल बॅनरमध्ये, कंपनीने सांगितले आहे की टॉप डील्स (Top Deals) येणार आहेत. या बॅनरमध्ये आयफोनही दिसतोय. असे मानले जात आहे की या सेलमध्ये Flipkart iPhone 14 वर क्रेझी डील आणू शकते. यासोबतच एक्सचेंज ऑफरही मिळतील अशी अपेक्षा आहे.

Flipkart Big Saving Days Sale
Tata Tiago Sales Milestone: टाटा टियागोची जबरदस्त कामगिरी, गाठला ५ लाख युनिट्सच्या विक्रीचा टप्‍पा

सेल किती दिवस सुरू राहील

या सेलमध्ये 128GB स्टोरेज वेरिएंटसह iPhone 14 60,999 रुपयांना खरेदी करता येईल. तथापि, फ्लिपकार्टने अद्याप अधिकृत डिस्काउंट ऑफर जाहीर केलेली नाही. आधीच्या सेलमध्ये, iPhone 14 67,999 रुपयांना सादर करण्यात आला होता, जो वास्तविक किंमतीपेक्षा 12,000 रुपये कमी होता. तसेच या सेलमध्ये फोन सुमारे 60 हजार रुपयांच्या किंमतीत ऑफर केला जाऊ शकतो.

  • इयरफोन, स्मार्ट टीव्ही, स्मार्टवॉच आणि लॅपटॉप (Laptop) आणि इतर गेमिंग अॅक्सेसरीज यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर सेलमध्ये 80 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाऊ शकते.

  • फ्रीज, फॅन आणि वॉशिंग मशिन आणि एसीवर 75 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे.

  • iPhone 14 व्यतिरिक्त Android स्मार्टफोन्सच्या खरेदीवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट ऑफर दिल्या जात आहेत. सेलमध्ये, अॅक्सिस बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या खरेदीवर 10 टक्के झटपट सवलत ऑफर दिली जात आहे. Realme 11 मालिका स्मार्टफोन स्वस्तात विक्रीसाठी ऑफर केले जाऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com