Ola Electric Scooter Saam Tv
लाईफस्टाईल

Ola Electric Scooter: काही मिनीटात गाडी होणार फुल चार्ज; कंपनीची नविन सुविधा

लॉन्च होण्यापूर्वीच भारतात ओला इलेक्ट्रिक स्कूटरला (Ola Electric Scooter) जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

वृत्तसंस्था

लॉन्च होण्यापूर्वीच भारतात ओला इलेक्ट्रिक स्कूटरला (Ola Electric Scooter) जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. वास्तविक ही स्कूटर अनेक सेगमेंट आणि फर्स्ट फीचर्ससह बाजारात येणार आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरच्या शैलीपासून ते तंत्रज्ञानापर्यंत कंपनीने बरेच काम केले आहे. हेच कारण आहे की लॉन्च होण्यापूर्वीच त्याची लोकप्रियता वेगळ्या पातळीवर पोहोचली आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यासाठी तसेच लोकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने आणखी एक मार्ग निवडला आहे. ज्यामुळे लोक आपली गाडी काही मिनीटात फुल चार्ज करु शकतील.

कंपनी स्वतःचे हायपर-चार्जिंग नेटवर्क तयार करणार आहे. ज्याच्या मदतीने ओला इलेक्ट्रिक स्कूटरचा चालक त्यांच्या गाडीला अवघ्या काही मिनिटांत चार्ज करुण दुरवरच्या अंतरावर नेऊ शकेल. ओला देशातील 400 शहरांमध्ये आपले हायपर चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. हे हायपर चार्जर कोणताही वेळ न घालवता गाडीला फुल चार्ज करेल तेही खूप कमी वेळात.

कंपनीच्या या निर्णयामुळे ग्राहकांना आणि कंपनीला अनेक फायदे होणार आहेत. त्यातील एक म्हणजे या सुविधीमुळे ग्राहक स्कुटर घेण्यासाठी आकर्षित होतील. कारण भारतातील कोणत्याही इलेक्ट्रिक कंपनीने आतापर्यंत अशी सुविधा दिलेली नाही. ओला ही पहिलीच कंपनी आहे जी आपले स्वत:चे चार्जींग स्टेशन उभारणार आहे.

आशा आहे की ग्राहक या स्कुटरला खरेदी करतील कारण ही स्कुटर वन टाईम इंन्वेस्टमेंट आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटरचे बुकिंग काही दिवसांपूर्वी 499 रुपयांवर सुरू झाले. त्यानंतर ग्राहकांनी अवघ्या 24 तासातच कंपनीला एक लाखाहून अधिक स्कूटरचे बुकिंग मिळाले. ओला इलेक्ट्रिक स्कूटरची राइडिंग रेंज अंदाजे सुमारे 150 किमी असेल.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बनावट ऑनलाईन अ‍ॅप प्रकरणात चौकशीत नसतानाही शेटे यांचे आत्महत्येचं पाऊल

Divya Deshmukh Chess World Cup : दिव्या देशमुख बनली वर्ल्ड चॅम्पियन! नागपूरच्या १९ वर्षीय लेकीनं घडवला इतिहास

Brain Exercises: मेंदूला तीक्ष्ण करण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी करा 'या' ब्रेन ॲक्टिव्हिटिज

Thane Traffic : घोडबंदर रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढली; जाणून घ्या कारण

Gokak Waterfalls: सांगलीपासून २ तासांच्या अंतरावर आहे 'हा' धबधबा; गर्दी नको असेल तर आहे परफेक्ट डेस्टिनेशन

SCROLL FOR NEXT