पावसाळ्यात मासिक पाळीदरम्यान होणारे इन्फेक्शन टाळायचे असेल तर...

थोडासाही निष्काळजीपणा केल्यास मूत्रमार्गाचे (Urinary tract) आणि योनिमार्गाचे इन्फेक्शन ((vaginal infections) होऊ शकते.
पावसाळ्यात मासिक पाळीदरम्यान होणारे इन्फेक्शन टाळायचे असेल तर...
पावसाळ्यात मासिक पाळीदरम्यान होणारे इन्फेक्शन टाळायचे असेल तर... Saam tv
Published On

Avoid Infection during : पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांचा मोठा धोका असतो. खासकरुन महिलांना मासिक पाळीच्या दिवसात असे इन्फेक्शन होण्याची दाट शक्यता असते. पावसाळ्यात महिलांनी वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. म्हणून, थोडासाही निष्काळजीपणा केल्यास मूत्रमार्गाचे (Urinary tract) आणि योनिमार्गाचे इन्फेक्शन (vaginal infections) होऊ शकते.

पावसाळ्यात मासिक पाळीदरम्यान होणारे इन्फेक्शन टाळायचे असेल तर...
बँकेत पैसे ठेवून जास्त व्याज पाहिजे, तर हे करा!

मासिक पाळीच्या वेळी महिलांनी स्वच्छतेची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यात इन्फेक्शन होऊ नये यासाठी इतर दिवसांपेक्षा थोडी जास्तच काळजी घ्यावी लागते. आरोग्य तज्ञांच्या मते, पावसाळ्यामध्ये संसर्गजन्य जीवाणूंची वाढ जलद गतीने होत असते. दुसरे म्हणजे, हवामानातील आर्द्रतेमुळे आपले कपडे ओलसर राहतात.पावसाळ्यात अंडरगारमेंट्स देखील ओले राहतात. या कारणास्तव, या पावसाळ्यात योनिमार्गाच्या इन्फेक्शन होण्याची शक्यताही सर्वाधिक असते. म्हणून, महिलांनी पीरियड्स दरम्यान काही आवश्यक खबरदारी घेणे आवश्यक असते.

- पावसाळ्यात इन्फेक्शन न होण्यासाठी करा हे उपाय

ओलावा कमी करा

पीरीयड्स दरम्यान आपला खाजगी भाग आधीपासूनच खूप ओला असतो. त्यात पावसामुळे हवामानातही ओलावा कायम राहतो. अशा परिस्थितीत, जेव्हा स्त्रिया शौचास गेल्यानंतर किंवा पाण्याचा वापर करूनही ते शरीराचे तो भाग कोरडा करत नाहीत. त्यामुळे त्या भागातील ओलावा अधिक वाढतो. ज्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यताही वाढते. म्हणूनच, जेव्हा तुम्ही टॉयलेटमध्ये जाता किंवा पाण्याचा वापर करता, तेव्हा तुमचा खासगी भाग कागदाच्या नैपकिनच्या म्हणजे टिशू पेपरच्या सहाय्याने पूर्णपणे वाळवा, त्यानंतर पॅड वापरा.

२. नॅपकिन्स बदलत रहा

बर्‍याच स्त्रिया पीरीयड्समध्ये दिवसभर एकच पॅड वापरतात. जे योग्य नाही. कारण पावसाळ्याच्या दिवसात पॅड जास्त वेळ वापरल्यास त्याद्वारे संसर्ग होण्याचा धोकाही वाढतो असतो. म्हणूनच, तीन ते चार तासांच्या अंतराने पॅड बदलणे आवश्यक आहे.

३ साबण वापरू नका

पीरीयड्स दरम्यान, बहुतेक स्त्रिया खाजगी भागावर फक्त सामान्य साबण वापरतात, जे अजिबात योग्य नाही. खासगी भागावर फक्त सामान्य साबण वापरल्याने नैसर्गिक पीएच पातळी खराब करू शकते, जे आरोग्यासाठी चांगले नाही. बाजारात पीरीयड्स दरम्यान खासगी भाग स्वच्छ करण्यासाठी अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. या काळात या उत्पादनांचा वापर करावा.

पावसाळ्यात मासिक पाळीदरम्यान होणारे इन्फेक्शन टाळायचे असेल तर...
रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी करा 'ही' सोपी योगासने

४. कोमट पाण्याने साफ करणे

झोपण्यापूर्वी दररोज रात्री कोमट पाण्याने आपला खाजगी भाग स्वच्छ करा. यानंतर टीश्यू पेपरच्या सहाय्याने तो भाग पूर्णपणे कोरडा केल्यावरच पॅड वापरा. यामुळे संसर्ग होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com