बँकेत पैसे ठेवून जास्त व्याज पाहिजे, तर हे करा!

सध्यातरी बँकेत बचत खात्यांवर व्याजदरावर निचांकी पातळीला गाठली आहे.
बँकेत पैसे ठेवून जास्त व्याज पाहिजे, तर हे करा!
बँकेत पैसे ठेवून जास्त व्याज पाहिजे, तर हे करा!Saam Tv
Published On

मुंबई : सध्यातरी बँकेत Bank बचत खात्यांवर व्याजदरावर निचांकी पातळीला गाठली आहे. यावेळी अनेकजण रिकरिंग डिपॉझिट RD खात्यामध्ये गुंतवणूक Investment करुन, जास्त व्याज मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. काही लोकांना महिन्याला नियमित उत्पन्न मिळत असत. त्यांच्याकरिता RD खात्यात गुंतवणूक करणे हा चांगला पर्याय आहे. प्रत्येक महिन्याला RD मध्ये १ ठराविक रक्कम जमा करायचीआहे.

या रक्कमेवर २.५० ते ८.५० टक्के एवढा व्याजदर मिळू शकणार आहे. एकूण RD खात्यामध्ये फिक्स डिपॉझिट प्रमाणेच व्याज देखील दिले जात असते. पण प्रीमियम प्रत्येक महिन्याला जमा करण्याची मुभा राहत असते. तुम्ही RD खात्यामध्ये अगदी १० रुपयांपासून गुंतवणूक करु शकणार आहे. पोस्ट ऑफिसात १० रुपयांची RD काढण्याची देखील सुविधा आहे.

हे देखील पहा-

RD मध्ये तुम्ही अगदी ६ महिन्यांपासून ते १० वर्षांच्या कालावधीपर्यंत पैसे जमा करु शकणार आहे. यावर चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळत राहील. RD मध्ये गुंतवणूक केल्यावर मध्येच पैसे काढता येणार नाही. तुम्ही वेळेअगोदरच पैसे काढल्यास त्यावर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. सध्याच्या परिस्थितीत इंडसइंड बँक RD खात्यामध्ये सर्वाधिक व्याज मिळत आहे.

सामान्य नागरिकांकरिता हा व्याजदर ७.२५ ते ८ टक्के इतका राहणार आहे. तर ज्येष्ठ नागरिकांकरिता हा व्याजदर ७.७५ ते ८.५० टक्के इतका राहणार आहे. स्मॉल फायनान्स बँकांकडून RD वर ६.७५- ८.५० टक्के इतका व्याज मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांकरिता हा व्याजदर ७.३५- ९.१० टक्के एवढा राहणार आहे. मोठ्या बँकेत RD चा व्याजदर हा साधारण ५ ते ७ टक्क्यांच्या जवळच राहणार आहे.

बँकेत पैसे ठेवून जास्त व्याज पाहिजे, तर हे करा!
पाच हजार विद्यार्थ्यांची जिल्हा बँकेत उघडली झिरो बॅलन्स खाते

ICICI बँकेने मोबाईल App च्या माध्यमातून RD खाते खोलण्याकरिता सुविधा दिली जाणार आहे. यासाठी तुम्हाला हे App स्मार्ट फोनमध्ये डाऊनलोड करावे लागणार आहे. हे अकाऊंट उघडल्यावर प्रत्येक महिन्यात तुमच्या खात्यामधून विशिष्ट रक्कम घेतली जाणारं आणि RD मध्ये जमा होणार आहे. ज्येष्ठ नागरिक आणि सामान्यांसाठी RD चा दर हा वेगवेगळा राहणार आहे.

तुम्ही RD खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला ५ हजार रुपयांच्या गुंतवणुकी पासून सुरुवात करु शकणार आहे. समजा तुम्ही ६ वर्षापर्यंत गुंतवणूक केली व तुम्हाला ५.५ टक्के व्याज मिळाले तर २०२७ पर्यंत तुम्हाला साधारण ६६,९७५ रुपये एवढे व्याज मिळणार आहे. याचा अर्थ महिन्याला फक्त ५ हजारांची गुंतवणूक करत तुम्हाला ६ वर्षांनी ४,२६,९७५ रुपये मिळणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com