पाच हजार विद्यार्थ्यांची जिल्हा बँकेत उघडली झिरो बॅलन्स खाते

पाच हजार विद्यार्थ्यांची जिल्हा बँकेत उघडली झिरो बॅलन्स खाते
jdcc bank jalgaon
jdcc bank jalgaonjdcc bank jalgaon
Published On

जळगाव : जळगाव जिल्हा बँकेच्या सर्व शाखांमध्ये आज पहिल्याच दिवशी झिरो बॅलन्सवर पाच हजार विद्यार्थ्यांची खाती उघडण्यात आली आहेत. अशी माहिती जिल्हा बॅंकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी दिली. (poshan-aahar-zero-balance-account-open-jalgaon-district-bank)

शालेय विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेचे पैसे प्रत्यक्ष त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे. यासाठी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये विद्यार्थ्यांना खाते उघडण्यास अडचणी येत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे झिरो बॅलन्स खाते जिल्हा बँकांच्या शाखेत घडण्यास परवानगी द्यावी; असा प्रस्ताव जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला देण्यात आला होता. या प्रस्तावाला जिल्हा परिषदेकडून ग्रीन सिग्नल करण्यात आला.

jdcc bank jalgaon
गॅस सिलेंडर, चारचाकीची अंत्‍ययात्रा; मुक्‍ताईनगरात राष्‍ट्रवादीतर्फे आंदोलन

अंमलबजावणीला सुरवात

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून त्याबाबत शालेय पोषण आहार योजनेच्या निधीसाठी विद्यार्थ्यांचे आधार लिंक असलेले झिरो बॅलन्स खाते उघडण्यात यावे, असे पत्र जिल्हा बँकेला देण्यात आले होते. जिल्हा बँकेकडून सर्व शाखांना परिपत्रक काढून विद्यार्थ्यांना प्राधान्याने खाते उघडण्याबाबत सूचना देण्यात आल्या. त्याची अंमलबजावणी आजपासून जिल्हा बँकेच्या विविध शाखांमध्ये सुरू झाली आहे. सायंकाळपर्यत चार ते पाच हजार विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने झिरो बॅलन्सवर खाती उघडली आहेत

पोषण आहारासाठी बँकेत आधारलिंक असलेले खाते उघडणे आवश्‍यक आहे. परंतु राष्ट्रीयकृत बँका विद्यार्थ्यांचे जाँइंट खाते झिरो बॅलन्सद्वारे उघडण्यास तयारी नाहीत. विद्यार्थ्यांना प्रतिसाद मिळत नसल्याने ते या लाभापासून वंचित राहणार होते. यामुळे आम्ही विद्यार्थ्यांचे मोफतखाते उघडण्यासाठी पुढाकार घेतला.

ॲड. रोहिणी खडसे, जिल्हा बँक अध्यक्षा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com