Obesity problem in India saam tv
लाईफस्टाईल

Obesity prevention: भारतीयांमध्ये वाढतेय लठ्ठपणाची समस्या; आरोग्य मंत्रालयाने दिल्या धोका कमी करण्याच्या सोप्या टीप्स

Obesity problem in India: लठ्ठपणा कमी करण्याचे उपाय (Tips to reduce obesity) शोधणाऱ्यांसाठी, भारताच्या आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) काही सोपे आणि प्रभावी उपाय सुचवले आहेत, ज्यामुळे तुम्ही या धोक्यापासून स्वतःचे रक्षण करू शकता.

Surabhi Jayashree Jagdish

  • भारतात लठ्ठपणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

  • 24% महिला आणि 23% पुरुष लठ्ठ आहेत.

  • लठ्ठपणामुळे मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

भारतामध्ये लठ्ठपणाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसतंय. हा एक गंभीर आरोग्याचा मुद्दा आहे. अनेक वेळा या समस्येकडे दुर्लक्ष केलं जातंय पण वजन जास्त झाल्यानं शरीरावर अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. भारतात लठ्ठपणा वाढत असून राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS)-5 नुसार, एकूणच 24% भारतीय महिला आणि 23% पुरुष जास्त वजनदार किंवा लठ्ठ असल्याची माहिती आहे.

शहरीकरण, बदलती जीवनशैली, आहारातील बदल आणि तंत्रज्ञानाचा वापर या सर्व गोष्टींमुळे ही समस्या वाढताना दिसतेय. दक्षिण आशियामध्ये लठ्ठपणाचे प्रमाण सर्वाधिक वेगाने वाढत असल्याचंही पाहायला मिळतेय. या वाढत्या लठ्ठपणामुळे देशावर मोठे आर्थिक आणि आरोग्यविषयक संकट येण्याची शक्यता आहे, असं अनेक रिपोर्ट्समधून सांगण्यात आलंय.

लठ्ठपणाचे कोणते धोके आहेत?

लहान असो किंवा मोठं वय, लठ्ठपणा हा प्रत्येक वयोगटातील व्यक्तींमध्ये दिसून येतो. यामुळे मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब यांसारख्या गंभीर आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. आरोग्य मंत्रालयाने लठ्ठपणावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या खाण्याच्या सवयी सुचवल्या आहेत. या सवयी काय आहेत ते जाणून घेऊया.

प्रोटीनयुक्त आहार निवडा

दररोजच्या जेवणात संतुलित पोषण असणं खूप गरजेचं आहे. यावेळी शरीराला पोषण मिळून वजन आटोक्यात राहण्यासाठी आहारात प्रोटीन, धान्य आणि भाज्यांचा योग्य समावेश करावा.

जंक फूडपासून दूर रहा

आरोग्य मंत्रालयाने असंही सांगितलंय की, प्रोसेस्ड फूड, तेलकट पदार्थ आणि जास्त साखर असलेलं अन्न टाळणं गरजेचं आहे. थंड पेयं, मिठाई, गोड पदार्थ, केक, बिस्किटं यांसारख्या गोष्टी लठ्ठपणा वाढवतात आणि आरोग्याचं नुकसान करतात.

फळं-भाज्यांचा समावेश करा

आरोग्य मंत्रालयानं ताज्या फळं, भाज्या आणि पूर्ण धान्य आहारात घेण्याचा सल्ला दिला आहे. या पदार्थांमध्ये जीवनसत्त्वं, खनिजं, फायबर आणि शरीराला उपयोगी घटक असतात, जे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत.

नियमितपणे व्यायाम करा

व्यायाम करणं हे प्रत्येक व्यक्तीला निरोगी ठेवण्यास मदत करतं. शिवाय यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी निघून जाण्यास मदत होते. त्यामुळ लठ्ठपणा कमी करायचा असेल तर तुम्ही व्यायामाचीही मदत घेऊ शकता. यासोबत जीवनशैलीत बदल केल्यास निकाल चांगले मिळू शकतात.

भारतात लठ्ठपणाचे प्रमाण किती आहे?

NFHS-5 नुसार 24% महिला आणि 23% पुरुष लठ्ठ आहेत.

लठ्ठपणामुळे कोणते गंभीर आजार होण्याचा धोका असतो?

मधुमेह, हृदयविकार आणि उच्च रक्तदाब होण्याचा धोका असतो.

आरोग्य मंत्रालयाने आहारात कोणता पदार्थ टाळण्याचा सल्ला दिला आहे?

जंक फूड, प्रोसेस्ड फूड आणि गोड पदार्थ टाळावेत.

वजन कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा?

प्रोटीनयुक्त, फळे, भाज्या आणि पूर्ण धान्यांचा आहार घ्यावा.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी कोणता उपाय फायदेशीर आहे?

नियमित व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैली फायदेशीर आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fashion Tips: फिटिंग ड्रेसमध्ये तुम्हाला देखील अनकम्फर्टेबल वाटत असेल; तर खरेदी करताना या टिप्स करा फॉलो

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करा - गुणरत्न सदावर्ते

Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको, त्यांना वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्या - मुधोजी राजे भोसले

Manoj Jarange: सरकारने गोळ्या झाडल्या तरी मागे हटणार नाही; मनोज जरांगे भडकले|VIDEO

Amit Shah : अमित शहा यांचं शीर धडावेगळं करून टेबलावर ठेवा; महिला खासदाराच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT