Breast Cancer saam tv
लाईफस्टाईल

Breast Cancer: शहरी महिलांमध्ये स्तन कर्करोगाचा धोका वाढला, कारणे कोणती?

Breast Cancer Increasing In City Women : महाराष्ट्रातील शहरी भागांमध्ये महिलांमध्ये स्तन कर्करोगाचा धोका झपाट्याने वाढत आहे. परंतु, यामागील कारणे कोणती, जाणून घ्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अलीकडेच झालेल्या आरोग्य सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रातील १५ ते ४९ वयोगटातील प्रत्येक चार व्यक्तींमध्ये एक व्यक्ती लठ्ठपणाने ग्रस्त आहे. तज्ज्ञांचे मते लठ्ठपणाचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. विशेषतः महिलांमध्ये लठ्ठपणामुळे अनेक आजारांना आमंत्रण दिले जाते. तसेच लठ्ठपणामुळे स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. म्हणून लठ्ठपणा महिलांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. स्तनाच्या कर्करोगाची कारणे कोणती, जाणून घ्या.

शहरांमध्ये वाढतोय स्तन कर्करोगाचा धोका

भारताच्या नॅशनल कॅन्सर रजिस्ट्रेशन प्रोग्रामच्या आकडेवारीनुसार सुमारे ३०% महिलांना स्तन कर्करोगाचा त्रास होतो. शहरी भागातील महिला विशेषतः जास्त धोक्यात आहेत, कारण शहरी महिलांची जीवनशैली ही फार वेगळी असते. धावपळीच्या जीवनातील बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, अनहेल्दी आहार, व्यायामाचा अभाव आणि ताणतणाव या गोष्टी स्तनाच्या कर्करोगासाठी कारणीभूत आहेत.

तज्ज्ञांचे मत

“स्थूलता केवळ वजनावर परिणाम करत नाही. ती इन्सुलिन रेझिस्टन्स, सूज, जास्त इस्ट्रोजेन पातळी, मधुमेह आणि फॅटी लिव्हर यांसारख्या समस्या निर्माण करते, ज्यामुळे स्तन कर्करोगाचा धोका वाढू शकतो,” असे डॉ. देवेंद्र पाल, वरिष्ठ कर्करोगतज्ज्ञ, एमओसी कॅन्सर सेंटर यांनी सांगितले.

अशी घ्या काळजी

कर्करोगापासून बचावासाठी दररोजच्या जीवनात महत्वपूर्ण बदल केले पाहिजेत. सर्वप्रथम वजन नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. अतिरिक्त चरबींमुळे आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लाग शकते, तसेच दररोज आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करा. दररोज कमीत कमी ३० ते ४० मिनिटे व्यायाम किंवा योगा करा. आरोग्यतज्ज्ञ डॉ. पाल यांनी सांगितले की, 'आरोग्यदायी वजन राखणे, योग्य आहार घेणे, नियमित व्यायाम करणे आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे हे सर्व स्तन कर्करोग रोखण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: ठाकरे सेनेच्या सावकार नेत्याचा माज उतरवला; अपहरण प्रकरणी ठोकल्या बेड्या,नंतर काढली धिंड

Mumbai Accident : मुंबईत अपघाताचा थरार; छटपूजेहून परतणाऱ्या तरुणाचा मृत्यू

Asthma: अस्थमाची लक्षणे कोणती? अशी घ्या काळजी

Bihar Election : निवडणुकीआधी माजी उपमुख्यमंत्र्यांचा दणका; 27 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार? चाहत्यांमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT