Smoke Biscuit side effects Saam TV
लाईफस्टाईल

Nitrogen Smoke Biscuit : सावधान! तोंडातून धूर सोडणारी बिस्किटे खाताय? जडतील गंभीर आजार, पाहा VIDEO

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या बाजारात तोडांतून धूर सोडणारी बिस्किटे विक्रीला आली आहे. त्यामुळे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांमध्ये या बिस्किटांचे आकर्षण वाढले आहे. मात्र, तुम्हीही जर धूर सोडणारी बिस्किटे खात असाल तर वेळीच सावध व्हा. कारण, हा धूर मानवाच्या फुफ्फुसापर्यंत जाऊन इजा करतो. त्यामुळे श्वसन विकार संभवतात, असे निरीक्षण एका अभ्यासातून नोंदवण्यात आले आहे.

धूर निघणारे बिस्कीट हे जत्रा, मेळावे, लग्न समारंभ, ग्रामीण भागात असे बिस्कीट विकले जातात. धूरवालं बिस्कीट खाताना तुम्हाला मस्त वाटत असेल मात्र, हा धूर तुम्हाला आजारी पाडेल. ही बिस्कीटं नायट्रोजनमध्ये बुडवली जात असल्याने त्यातून धूर निघतो. हा धूर माणसाच्या फुफ्फुसापर्यंत जाऊन इजा करतो.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, ही बिस्किटे तोंडात टाकल्यावर धूर सोडतात आणि त्यातून नायट्रोजनची वाफ निघते. ही नायट्रोजनची अतिथंड वाफ तोंडाद्वारे फुफ्फुसांपर्यंत जाते. हे बिस्कीट खाणं खूपच हानिकारक असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, या धूरवाल्या बिस्कीटमुळे काय गंभीर परिणाम होतात पाहुयात.

धूर सोडणारी बिस्कीट आरोग्यास घातक

  • बिस्कीट नायट्रोजनमध्ये बुडवल्याने त्यातून धूर निघतो.

  • धूर माणसाच्या फुफ्फुसापर्यंत जाऊन इजा करतो.

  • बिस्कीटच्या धुरामुळे दमा, श्वसन विकार वाढतात.

  • गळ्यात अस्वस्थ आणि श्वसननलिका बधिर वाटू लागते.

  • बुजलेले नाक, गळ्यात खवखव, डोकेदुखीही होते.

  • नायट्रोजन धुरामुळे जीभ, ओठ जळू शकतात.

कुठलाही वयोगट असला तरी असा प्रकार घडू शकतो. त्यामुळे लिक्विड नायट्रोजन पदार्थ खाऊ नयेत. खाताना जरी मस्त वाटत असलं तरी याचे गंभीर परिणाम आरोग्यावर होतात. त्यामुळे असे प्रकार करणं टाळा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांसाठी महिला टार्गेट?

Top 10 Headlines: माजी गृहराज्यमंत्र्याची शिवीगाळ, नागपूरच्या सरकारी रुग्णालयातील औषधे बनावट; वाचा टॉप १० हेडलाइन्स

Onion Crops : घोषणांचा नुसताच पाऊस; दीड वर्षांपूर्वीचे 24 कोटी मात्र अद्याप रखडलेले, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा कधी?

Pune Helicopter Crash: हेलिकॉप्टरचे अक्षरश: तुकडे... उड्डाणानंतर ४ मिनिटांत कोसळलं, अपघात नेमका कसा झाला?

Gold Silver Price: सोने-चांदी ऐन सणासुदीत महागले; सोने ७७ हजारांच्या पार; जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

SCROLL FOR NEXT