Hingoli News : मिटिंग सुरु असताना हृदयविकाराचा झटका, महावितरणच्या अभियंत्याचा जागीच मृत्यू; हिंगोलीत खळबळ

Hingoli Mahavitaran Engineer Dies : व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मीटिंग सुरू असताना विद्युत अभियंत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना हिंगोली जिल्ह्यात घडली
Hingoli Mahavitaran Engineer Dies
Hingoli Mahavitaran Engineer DiesSaam TV
Published On

संदीप नागरे, साम टीव्ही हिंगोली

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मीटिंग सुरू असताना विद्युत अभियंत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना हिंगोली जिल्ह्यात घडली. मंगळवारी (ता. १) दुपारी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. दत्तात्रेय कोळपे असे या मृत झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. वरिष्ठांच्या दबावामुळे ताण-तणाव येऊन मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

Hingoli Mahavitaran Engineer Dies
Kolhapur News : हत्येच्या चर्चेने गावभरात खळबळ; पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून समोर आलं भलतंच सत्य

वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात तातडीने कारवाई व्हायला हवी, अशी मागणी देखील कोळपे यांच्या नातेवाईकांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीत विजेची वसुली करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांची मंगळवारी दुपारी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक सुरु होती. या बैठकीत दत्तात्रेय कोळपे देखील सहभागी झाले होते.

बैठकीत विजेची देयक वसुली का होत नाही. तातडीने थकबाकी वसुली करा, अशा सूचना वरिष्ठ अधिकारी देत होते. यावेळी मिटींग सुरु असताना कोळपे यांच्या छातीत दुखू लागले. काही क्षणातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते खुर्चीवरून खाली कोसळले.

यावेळी सहकारी कर्मचाऱ्यांनी कोळपे यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचार सुरू होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. अंगाचा थरकाप उडवणारा हा प्रकार मिटिंगमध्ये सहभागी असलेल्या इतर अधिकाऱ्यांनी आपल्या डोळ्यादेखत बघितला. या घटनेनंतर मृत सचिन कोळपे यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेत मोठा आक्रोश केला.

कोळपे यांच्या मृत्यूला वरिष्ठ अधिकारी जबाबदार असून कामाचा अतिरिक्त ताणतणाव आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी नातेवाईकांनी तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणात मंगळवारी रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.

Hingoli Mahavitaran Engineer Dies
Yoga For Heart : हृदयविकार ओळखायचा कसा? या 3 लक्षणांद्वारे जाणून घ्या आणि ही योगासने करा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com