Kolhapur News : हत्येच्या चर्चेने गावभरात खळबळ; पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून समोर आलं भलतंच सत्य

Kolhapur News in Marathi : कोल्हापुरातील हत्येच्या चर्चेने खळबळ उडाली होती. त्यानंतर या प्रकरणाचं पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून भलतंच सत्य समोर आलं आहे.
हत्येच्या चर्चेने गावभरात खळबळ; पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून समोर आलं भलतंच सत्य
Kolhapur News Saam tv
Published On

रणजीत माजगावकर, साम टीव्ही प्रतिनिधी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील नवे पारगाव येथे आज सकाळी दुचाकीस्वाराचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. दुचाकीस्वाराच्या अचानक मृत्यू झाल्याने गावभर त्याच्या हत्येची चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने या व्यक्तीचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील नवे पारगाव येथे सकाळी नितीन भोसले यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळला होता. नितीन भोसले यांचा मृतदेह रस्त्याच्या आढळल्याने गावात खळबळ उडाली होती. मृतदेह आढळल्यानंतर त्यांची हत्या झाल्याची चर्चा वाऱ्यासारखी गावात पसरली. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.

हत्येच्या चर्चेने गावभरात खळबळ; पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून समोर आलं भलतंच सत्य
Cyber Crime : सीबीआय अधिकारी असल्याचे भासवत १ कोटीत फसवणूक; संशयिताला जयपूरमधून घेतले ताब्यात

पोलिसांनी तातडीने नितीन भोसले यांचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरु केला होता. मात्र, त्यांच्याकडून या प्रकरणाचा काहीच सुगावा लागत नव्हता.

हत्येच्या चर्चेने गावभरात खळबळ; पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून समोर आलं भलतंच सत्य
Pune Cyber crime : जादा परतावाचे आमिष पडले महागात; पुण्यातील तरुणाची १ कोटी ९४ लाखात फसवणूक

दरम्यान, नितीन भोसले यांच्या शवविच्छेदनाच्या अहवालात त्यांच्या अंगावर भाजल्याचा जखमा आढळून आल्या. तसेच फुफ्फुसही जळल्याचे आढळले. त्यामुळे अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी नैसर्गिक मृत्यूची नोंद दाखल केली.

चांदी व्यापाऱ्याची निर्घृण हत्या

कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी गावात काही दिवसांपूर्वी एका चांदी व्यावसायिकाची निर्घृण हत्या करण्यात आली. ब्रम्हनाथ सुकुमार हालोंढे असे हत्या झालेल्या व्यावसायिकाचं नाव आहे. त्याची हत्या करून सुमारे 25 किलो चांदीची चोरी झाल्याचे उघड झालं. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com