Cyber Crime : सीबीआय अधिकारी असल्याचे भासवत १ कोटीत फसवणूक; संशयिताला जयपूरमधून घेतले ताब्यात

Pimpri chinchwad News : पिंपरी चिंचवड परिसरातील रहिवासी असलेल्या एका जेष्ठ नागरिकाला मनी लॉन्ड्रीगच्या अडीच कोटी रुपयांच्या फ्रॉड केसमध्ये अटक करण्याची भीती घालून फसवणूक केली
Cyber Crime
Cyber CrimeSaam tv
Published On

पिंपरी चिंचवड : सीबीआय अधिकारी आणि बँक अधिकारी असल्याचे व्हॉटस्ॲप व्हिडिओ कॉलवर भासवून ६० वर्षीय जेष्ठ नागरिकाची फसवणूक करण्यात आली होती. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या या आरोपीला जयपूरमधून ताब्यात घेतले आहे. 

पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरातील रहिवासी असलेल्या एका जेष्ठ नागरिकाला मनी लॉन्ड्रीगच्या अडीच कोटी रुपयांच्या फ्रॉड केसमध्ये अटक करण्याची भीती घालून फसवणूक केली. यात ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यातून १ कोटी ८ लाख रुपयांचा डिजिटल करन्सी चेक करून ती व्हेरिफाय करून परत करतो म्हणत आरोपीने पिंपरी चिंचवड शहरातील एका जेष्ठ नागरिकाची (Cyber Crime) फसवणूक केली होती. या प्रकरणी सायबर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती.  

Cyber Crime
Sambhajinagar News : सीसीटीव्ही असेल तरच परीक्षा केंद्र कायम; सीबीएसईच्या धर्तीवर राज्य मंडळाचे धोरण

तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी मोठ्या शिताफीने मयंक अशोककुमार गोयल या आरोपीला राजस्थानच्या जयपूर शहरातून बेड्या ठोकल्या आहेत. या आधी देखील या फसवणुकीच्या गुन्ह्यात साहिल मुदलियार, क्षितिज क्षीरसागर आणि ओंकार नाईक यांना अटक करण्यात आली आहे. या बाबतचा अधिक तपास सायबर पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com