Sambhajinagar News : सीसीटीव्ही असेल तरच परीक्षा केंद्र कायम; सीबीएसईच्या धर्तीवर राज्य मंडळाचे धोरण

Sambhajinagar News : गैरप्रकार रोखण्यासाठी त्याचबरोबर विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आतापर्यंत अनेक वेळा सीसीटीव्ही बसवा आणि त्याचे स्टोरेज करण्याची चांगली क्षमता असावी;
Sambhajinagar News
Sambhajinagar NewsSaam tv
Published On

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : दहावी- बारावीच्या परीक्षा घेण्यात येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षांसाठी राज्य परीक्षा मंडळाने सीबीएससीच्या धर्तीवर नवे धोरण लागू केले आहे. या धोरणानुसार परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही असतील तरच परीक्षा केंद्र कायम ठेवण्यात येणार असल्याचे धोरण लागू केले आहे.  

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील (HSC Exam) गैरप्रकार रोखण्यासाठी त्याचबरोबर विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आतापर्यंत अनेक वेळा सीसीटीव्ही बसवा आणि त्याचे स्टोरेज करण्याची चांगली क्षमता असावी; अशा सूचना शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना वारंवार देण्यात आल्या होत्या. मात्र, आजही अनेक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्यात आले नाही. अनेकदा परीक्षा काळात अनुचित प्रकार होत असतात, मात्र ते रोखता येत नाहीत. 

Sambhajinagar News
Fraud Case : कॅब चालकाकडून बनावट फोन पे द्वारे फसवणूक; पेट्रोल भरल्यानंतर प्रकार उघड

दिवाळीनंतर केंद्रांवर झाडाझडती 

ही परिस्थिती पाहता आता सीबीएसई बोर्डाच्या धरतीवर फेब्रुवारी- मार्च महिन्यात होणाऱ्या परीक्षेत परीक्षा केंद्र कायम ठेवायचे असल्यास सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करण्यात आल्याची माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने देण्यात आली. दरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षा बरोबरच परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे दिवाळीनंतर परीक्षा केंद्राच्या झाडाझडतीला सुरुवात होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com