New Year Plan Saam Tv
लाईफस्टाईल

New Year Plan : नवीन वर्षात गोव्याला भेट देण्याचा विचार करताय ? तर, तिकीटांपासून ते खाद्यपदार्थ अगदी कमी दरात !

गोवा म्हटलं तर सगळ्याच मंडळीचे ठरलेले किंवा फ्लॉप झालेले प्लान इथून सुरु होतात.

कोमल दामुद्रे

New Year Plan : सध्या सगळ्यांना नवीन वर्षाचे वेध लागले आहे. पार्टी, मज्जा आणि आपल्या जीवलगांसोबत प्रत्येकाला कुठे ना कुठे जायचे आहे. गोवा म्हटलं तर सगळ्याच मंडळीचे ठरलेले किंवा फ्लॉप झालेले प्लान इथून सुरु होतात.

विकेंडच्या दिवसात गोव्याला जाण्याचा प्लान बराच जणांचा झाला असेल समुद्र किनाऱ्यांनी वेढलेले हे ठिकाण केवळ देशासाठीच नाही तर परदेशातही सर्वात आवडते राहिले आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये या ठिकाणचे सौंदर्य अनेक पटींनी वाढते. यादरम्यान, जर तुम्ही गोव्याला (Goa) जाण्याचा विचार करत असाल तर या लेखात आम्ही तुम्हाला या ठिकाणाविषयी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी सांगणार आहोत.

राजधानी दिल्लीपासून गोवा 1800 किमी अंतरावर आहे. हे अंतर रेल्वेने कापण्यासाठी 35 तास लागतात तर विमानाने प्रवास करण्यासाठी सुमारे अडीच तास लागतात. जाण्यापूर्वी तुम्ही बुकींग आवश्यक करा. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या (New-year) काळात वाढलेल्या गर्दीमुळे तुमची गैरसोय होऊ शकते. हे टाळण्यासाठी आधीच सर्व व्यवस्था करा. याबद्दल सविस्तरपणे समजून घेऊ.

1. दिल्लीहून गोव्याला कसे जायचे

दिल्लीहून गोव्याला जाण्यासाठी बस, ट्रेन आणि फ्लाइट हे तिन्ही पर्याय आहेत. रेल्वेने, मडगाव आणि वास्को-द-गामा ही दोन जवळची स्थानके आहेत, येथून तुम्ही सहज तिथे पोहोचू शकता. 35 तासांच्या या प्रवासासाठी IRCTC सुमारे 2100 रुपये आकारते. तुम्ही जवळपासच्या हॉटेलमध्ये राहू शकता, परंतु निघण्यापूर्वी तिकीट बुक करणे चांगले.

Goa

2. गोव्यात भेट देण्याची ठिकाणे

ज्यांना एकांत आणि नैसर्गिक सौंदर्य आवडते त्यांच्यासाठी गोवा हे सर्वोत्तम उत्तम स्थळ असू शकते. राज्याच्या उत्तरेस असलेल्या कँडोलिमला भेट दिली पाहिजे. समुद्रकिनारे आणि नैसर्गिक सौंदर्याने वेढलेले हे शहर पर्यटकांसाठी नेहमीच खास आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. निसर्गप्रेमींसाठी ते आवडते ठरले आहे.

Goa

3. गोव्यात खाण्यापिण्याची व्यवस्था

नैसर्गिक सौंदर्यासोबतच गोवा खाण्यापिण्याच्या बाबतीतही खूप चांगला मानला जातो. येथे सी-फूडची उत्तम व्यवस्था आहे. म्हणजेच मांसाहार करणाऱ्यांसाठी हे ठिकाण आनंद वाढवणारे ठरू शकते. रस्त्यावरील खाद्यपदार्थ आणि शाकाहारींसाठीही विविध प्रकारचे खाद्यपदार्थ येथे उपलब्ध आहेत. तुम्ही हा प्रवास दोन दिवसात करुन पुन्हा रिटर्न येऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट मिळणार! केंद्र सरकार मोठी घोषणा करण्याच्या तयारीत

Maharashtra Live News Update: लढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

Success Story: वडील घरोघरी जाऊन कपडे विकायचे, लेकाने मोठ्या जिद्दीने UPSC क्रॅक केली; IAS अनिल बसाक यांचा प्रवास

Maharashtra Politics : कोण होणार नाशिकचा पालकमंत्री? भुसे, महाजन, भुजबळांमध्ये रस्सीखेच? वाचा स्पेशल रिपोर्ट

Monday Horoscope : वाहने जपून चालवावी, मनोबल कमी होणार; ५ राशींच्या लोकांचा ताण वाढणार, वाचा सोमवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT