New Year Celebration in Goa : नवीन वर्षासाठी पार्टी प्लान करताय ? गोव्यातील 'या' प्रसिद्ध ठिकाणी भेट द्या

या नवीन वर्षात येणाऱ्या विकेंडला प्रत्येकाला शांत व सुंदर ठिकाणी फिरायला जाण्याची इच्छा असेल.
New Year Celebration in Goa
New Year Celebration in GoaSaam Tv

New Year Celebration in Goa : नवीन वर्षासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. या नवीन वर्षात येणाऱ्या विकेंडला प्रत्येकाला शांत व सुंदर ठिकाणी फिरायला जाण्याची इच्छा असेल, म्हणून ज्यांना नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला बाहेर जायचे आहे त्यांच्यासाठी गोव्यातील ही किनारे चांगली ठरतील.

भारतात नवीन वर्षात भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत, परंतु त्यातील प्रसिद्ध गोवा. नवीन वर्षाच्या सुरुवातीला गोवा सगळ्यांना अधिक आवडतो. नवीन वर्षानिमित्त येथे खूप छान पार्टी, अनेक प्रकारचे कार्यक्रम आणि धमाल असते. गोव्यात नवीन वर्ष साजरे करण्यासाठी देश-विदेशातून लोक येतात. हे ठिकाण त्याच्या सुंदर बीचसाठी प्रसिद्ध आहे. येथे काही समुद्रकिनाऱ्यांची नावे आहेत जिथे नवीन वर्षाचे उत्सव पाहण्यासारखे असतात. जाणून घ्या त्याबद्दल

New Year Celebration in Goa
New Year Celebration Famous Place : नवीन वर्षाचा सुर्योदय पाहायचा आहे ? भारतातील 'या' सुंदर ठिकाणांना भेट द्या

1. अंजुना बीच

anjuna beach
anjuna beachCanva

गोव्यातील सर्वात प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांपैकी एक, अंजुना बीचमध्ये हिप्पी संस्कृतीचा समृद्ध भूतकाळ आहे. रात्री या ठिकाणी नाईटलाइफसाठी सर्वोत्तम जागेपैकी एक असते. अंजुना बीचवर, गोव्यातील सर्वात लोकप्रिय नाईट क्लब समाविष्ट आहेत. येथे हँगआउट करण्यासाठी अनेक चांगली ठिकाणे आहेत. नवीन वर्षाच्या पार्टीसाठी (Party) तुम्ही या बीचवर जाऊ शकता.

2. मोरजिम बीच

morjim beach
morjim beachCanva

गोव्यातील नवीन वर्ष साजरे (Celebrate) करण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक म्हणजे नक्कीच नेत्रदीपक मोरजिम बीच. हा समुद्रकिनारा लिटल रशिया म्हणूनही ओळखला जातो. या ठिकाणी नवीन वर्षाची भव्य पार्टी आयोजित केली जाते. ट्रान्स म्युझिकचा आनंद घेण्यासाठी आणि लाइव्ह टेक्नो आर्टिस्ट्सच्या बीट्स ऐकण्यासाठी, मोरजिम बीच सर्वोत्तम आहे.

3. अरामबोल बीच

arambol beach
arambol beachCanva

अरामबोल बीच हा उत्तर गोव्यातील सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. अरामबोल हा चांदीचा वाळूचा समुद्रकिनारा आहे ज्यामध्ये खडक देखील आहेत ज्यामुळे ते खूपच आकर्षक बनते. हा गोव्यातील सर्वात हिरवागार किनारा आहे. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी तुम्ही या दरम्यान डिनर प्लान देखील करू शकता.

4. कळंगुट बीच

Calangute beach
Calangute beachCanva

कळंगुट हा गोव्यातील सर्वात लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. नाइटलाइफ प्रेमींसाठी पार्ट्या आणि लाइव्ह म्युझिकसह कलंगुट बीचचे नाइटलाइफ सर्वोत्तम आहे. येथे अनेक सुंदर रेस्टॉरंट आहेत. ३१ डिसेंबरच्या रात्री येथील दृश्य पाहण्यासारखे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com