Next Generation BMW X2 Saam Tv
लाईफस्टाईल

Next Generation BMW X2 चा टिझर लॉन्च! Audi आणि Jaguar ला देणार टक्कर

कोमल दामुद्रे

BMW X2 Launch Date :

बीएमडब्ल्यू ही प्रीमीयम कार उत्पादनातील नावाजलेली कंपनी आहे. कंपनी नेहमीच ग्राहकांसाठी नवीन कार लाँच करत असते. कंपनीने आता नवीन BMW X2 कार सादर केली आहे.

BMW X2 नवीन स्टाइलिंग, दोन पॉवरट्रेन आणि आधुनिक तंत्रज्ञानासह लवकरच लॉन्च होईल. या महिन्याच्या अखेरीस टोकियोमध्ये जपान मॉबिलिटी शोमध्ये ही कार लाँच करण्यात येणार आहे. त्यानंतर ही कार भारतीय बाजारपेठांमध्ये उपलब्ध होईल.

1. BMV X2 लूक

नवीन BMV X2 कार नवीन लूक आणि स्टाईलसह बाजारात (Market) येणार आहे. मागील मॉडेलपेक्षा ही कार खूप वेगळी असणार आहे. कारमध्ये कूपसारखी रुफलाइन असणार आहे. ही कार नवीन लूकसह बाजारात उपलब्ध होणार आहे. कारमध्ये एलई़डी हँडलॅम्प आणि टेललाइटदेखील असते. यात इल्युमिनेटेड किडनी ग्रिलचा समावेश आहे. जे x2ला x1 पेक्षा वेगळे दर्शवते.

2. इंटेरियर

नवीन BMW X2 मध्ये केबिनमध्ये बसण्यासाठी अधिक जागा देण्यात आली आहे. कारला वक्र डिस्प्ले आणि BMW इंटेलिजेंटद्वारे पर्सनल असिस्टंट टच आणि व्हॉइस कंट्रोल देण्यात आली आहे. याचसोबत 10.25 इंचाचा फोल्डेबल डिस्प्ले आणि 10.7 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट डिस्प्ले एकाच ग्लासमध्ये देण्यात आला आहे. यात केबिन कॅमेरादेखील आहे. हा कॅमेरा फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड करु शकतो.

3. इंजिन

नवीन जनरेशनच्या BMW X2 कारला X2 xDrive28i ला पावर देणारे 2.0 लिटर चार सिलेंडर इंजिन मिळत आहे. हे इंजिन 237bhp पॉवर आणि 400Nm टॉर्क निर्माण करु शकते. ही कार 6.2 सेकंदात 0-96 किमी प्रतितास वेग पकडू शकते.

नवीन टॉप व्हेरियंटमध्ये X2 M35i xDrive ला 2.0-लिटर इंजिन (Engine) देण्यात आले आहे. हे इंजिन 307bhp पॉवर आणि 400Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5.2 सेकंदात 0-96 किमी प्रतिसात वेग पकडू शकते. या दोन्ही कारमध्ये 7-स्पीड ड्युअल क्लच ट्रान्समिशन मिळते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात! ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

SCROLL FOR NEXT