Covid 1 SAAM TV
लाईफस्टाईल

New Covid Variant : कोरोना पुन्हा आला, ७५ म्यूटेशनसह नवा व्हेरियंट, तुम्हाला किती धोका?

New covid variant 2026: 75 म्यूटेशन असलेला नवीन कोरोना व्हेरिएंट समोर आला आहे. हा किती धोकादायक आहे, कोणाला जास्त धोका आहे आणि तज्ज्ञ काय सांगतात ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

कोरोनाने जवळपास ४ वर्ष संपूर्ण जगावर परिणाम केला होता. दरम्यान काही काळानंतर हा कोरोना हळू-हळू कमी होऊ लागला. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर लोकही निश्चिंत होते. यावेळी अनेकांनी मास्क लावणंही बंद केलं. मात्र आता पुन्हा एक धडकी भरवणारी बातमी समोर आलीये. ही बातमी म्हणजे कोरोनाचा एक नवा व्हेरिएंट समोर आल्याची माहिती आहे.

काही रिपोर्ट्सनुसार, या नव्या व्हेरिएंटमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले असून विशेषतः स्पाइक प्रोटीनमध्ये तब्बल 70 ते 75 म्यूटेशन दिसून आलेत. हा व्हेरिएंट इम्युनिटीला कमकुवत करून शरीरातील पेशींमध्ये प्रवेश करतो.

75 म्यूटेशन असलेला नवीन व्हेरिएंट नेमका काय?

हा नवीन कोरोना व्हेरिएंट पहिल्यांदा नोव्हेंबर 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेत आढळला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात म्यूटेशन झाल्यामुळे तो आधीच्या ओमिक्रॉनसारख्या व्हेरिएंटपेक्षा काहीसा वेगळा मानला जातो. या बदलांमुळे व्हायरस शरीराच्या इम्युनिटीपासून काही प्रमाणात बचाव करू शकतो. म्हणजेच ज्यांनी लस घेतली आहे किंवा ज्यांना आधी कोरोना झाला आहे, त्यांनाही पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता असते.

या व्हेरिएंट किती धोकादायक?

सध्याची परिस्थिती पाहता घाबरण्याची गरज नसल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. गेल्या काही वर्षांत अनेक लोकांमध्ये हायब्रिड इम्युनिटी तयार झालीये. म्हणजे लसीकरण आणि आधीचं इन्फेक्शन यांचा एकत्रित परिणाम शरीराला काही प्रमाणात संरक्षण देतो.

याशिवाय आता उपचार पद्धती काही प्रमाणात सुधारल्या आहेत. रुग्णालयं सज्ज असून तपासणी आणि औषधांची उपलब्धताही वाढली आहे. त्यामुळे रूग्णांची संख्या वाढली तरी त्याचा परिणाम आधीसारखा गंभीर होण्याची शक्यता कमी असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.

कोणत्या व्यक्तींना याचा धोका जास्त?

सर्वांसाठी धोका समान नसतो. काही व्यक्तींना अजूनही विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, आजारी असलेले रुग्ण, गर्भवती महिला आणि ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, अशांचा समावेश होतो.

या लोकांमध्ये संसर्ग गंभीर होण्याची शक्यता जास्त असते. तज्ज्ञांच्या मते, कोरोना आता पूर्णपणे संपणार नाही तर तो फ्लूसारखा एंडेमिक झाला आहे. त्यामुळे त्याच्यात वेळोवेळी वाढ आणि घट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हातनुर धरणाचे ८ दरवाजे उघडले, तापी नदीमध्ये १७,०२२ क्युसेक

Mulshi Waterfall : ५ ते १० मिनिटांच्या ट्रेकनंतर दिसतो 'हा' धबधबा, मुळशीजवळ लपलंय सुंदर ठिकाण

Famous Actor : शूटिंगदरम्यान प्रसिद्ध अभिनेत्याला चावला विषारी किडा; रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती गंभीर

Pune Traffic Change: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! आज शहरातील प्रमुख रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Rain Alert : आजही मुसळधार पाऊस! पुण्यासह घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट; मुंबईत पावसाची काय स्थिती? वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT