Kesar Panchmeva Kheer Saam TV
लाईफस्टाईल

Kesar Panchmeva Kheer: देवी भरभरून आशीर्वाद देईल आणि प्रसन्न होईल; नैवेद्यात बनवा पंचमेवा खिर

Ruchika Jadhav

हिंदू धर्मात नवरात्र उत्सवाला फार महत्व आहे. भारतात सर्वत्र नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू आहे. सर्वत्र देवीची आराधना केली जात आहे. या दिवसांमध्ये विविध ठिकाणी देवीच्या विविध रुपांची पुजा केली जाते. सर्वाधिक महत्व दुर्गा मातेला असते. दुर्गा मातेची पुजा करताना देवीला दररोज वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा लागतो. अशात देवीला रोज नवीन काय नैवेद्य बनवावा असा प्रश्न सर्वांच्याच मनात येतो. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी खास पंचमेवा नैवेद्याची रेसिपी आणली आहे.

देवी आपल्यावर प्रसन्न व्हावी, आपल्याला भरभरून आशीर्वाद द्यावा यासाठी नैवेद्य बनवताना विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे आज पंचमेवाची रेसिपी जाणून घेणार आहोत. ही रेसिपी अतिशय सिंपल आणि सोपी आहे. तुम्ही देवीसाठी हा नैवेद्य बनवल्यावर नातेवाईकांना देखील प्रसादासाठी ही खिर देऊ शकता.

साहित्य

केसर

मखाना

पिस्ता

बदाम

काजू

मनुके

तूप

वेलची

साखर

खवा

कृती

सर्वात आधी केसर एका टिशू पेपरमध्ये भरून घ्या. त्यानंतर हा पेपर गॅसवर गरम करा. केसर थेट तव्यावर गरम करता येत नाही. त्यामुळे ही ट्रिक ट्राय करा. त्यानंतर एका भांड्यात दूध तापण्यासाठी ठेवा. दूध छान गरम करून घ्या. दूध इतकं गरम कारयचं आहे की ते आटून आर्धा टोप झालं पाहिजे. याने दूधाला घट्ट टेक्सचर मिळतं आणि खिर अगदी क्रिमी लागते.

आता पुढे काजू, बदाम, पिस्ता या सर्वांचे बारीक काप करून घ्या. तयार काप एका पॅनमध्ये घ्या. पॅनमध्ये घेऊन हे सर्व काप छान तूप टाकून भाजून घ्या. ड्रायफ्रूट्स मस्त भाजून घेतल्यावर दुसऱ्या एका पॅनमध्ये काढून घ्या. आता दूध गॅसवर उकळत असतानाच त्यात केसरचे धागे टाकून घ्या. दूधाला छान केसरी रंग आला की त्यात बाकीचे ड्रायफ्रूट्स मिक्स करा.

पुढे यामध्ये मनुके आणि वेलची पुड मिक्स करा. तसेच तुमच्या आवडीनुसार तुम्ही यात साखर मिक्स करू शकता. सुका खवा सुद्धा फार महत्वाचा आहे. बाजारात गोड आणि फिका असे दोन्ही खवे मिळतात. खिरीमध्ये टाकण्यासाठाी तुम्ही फिका खवा निवडा. खवा थोडा वेगळा करून दुधात मिक्स करून घ्या. अशा पद्धतीने तयार झाली तुमची चविष्ट आणि सुंदर खिर. या खिरीचा नैवेद्य दिल्याने देवी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न राहिल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi Speech : समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, काँग्रेसपासून सावध राहा; वाशिमच्या सभेतून PM मोदींचा घणाघात

Coconut Water: रोज नारळ पाणी पिताय तर सावधान! आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

Marathi News Live Updates : काँग्रेस गरिबाला अजून गरीब करत आहे - PM मोदी

Women's T20 WC: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! लाजिरवाण्या पराभवानंतर स्पर्धेतून बाहेर पडण्याचं संकट ; पाहा Points Table

Chandrapur School Bus Accident : विद्यार्थांना घेऊन जाणारी स्कूल बस उलटली, बसमध्ये होते ६० विद्यार्थी

SCROLL FOR NEXT