Khandvi Recipe : घरच्याघरी बनवा गुजराती स्टाइल खांडवी; वाचा परफेक्ट रेसिपी

Khandvi Recipe in Marathi : घरच्याघरी तुम्ही सिंपल आणि सोप्या पद्धतीने तुम्ही खांडवी बनवू शकता. आज आम्ही याचे परफेक्ट माप आणि बनवण्याची योग्य पद्धत जाणून घेणार आहोत.
Khandvi Recipe in Marathi
Khandvi RecipeSaam TV
Published On

सर्वांना बाहेरचे चमचमीत आणि स्वादिष्ट पदार्थ खायला आवडत असतात. प्रत्येक शहर त्याच्या प्रेक्षणीय स्थळांमुळे किंवा खाद्यसंस्कृतीमुळे चर्चेत असतो. पण बाहेरचे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्याने आपल्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो. आयुष्यात सर्वांनाच नवनवीन ठिकाणी जाऊन तेथील पदार्थ ट्राय करायचे असतात. पण धापवळीच्या जीवनामुळे ते शक्य होत नाही, म्हणून आज तुमच्यासाठी गुजराती स्टाइल खांडवी रेसिपी घेऊन आलो आहोत. खांडवी खाण्यासाठी तुम्हाला गुजरात शहराला जाण्याची गरज नाही आहे. तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने खांडवी घरच्याघरी बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी.

Khandvi Recipe in Marathi
Curd Making: घरच्या घरी सोप्या पद्धतनं बनवा घट्ट दही; जाणून घ्या Recipe

साहित्य

बेसन पीठ

दही

मीठ

हळद

तेल

आलं-लसूण पेस्ट

किसलेले खोबरे

तीळ

मोहरी

बारीक चिरलेली हिरवी मिरची

बारीक चिरलेली कोथिंबीर

पाणी

कृती

प्रथम मिक्सरचे भांडे घ्या. त्यामध्ये बेसनाचे पीठ, दही, आले-लसूण पेस्ट, हळद, आणि चवीनुसार मीठ, पाणी टाकून मिक्सरमध्ये ग्राइंड करुन घ्या. त्यानंतर गॅस ऑन करुन पॅन ठेवा. त्यानंतर पॅनमध्ये मिक्सरमधील बॅटर अॅड करा. नंतर या बॅटरला चमच्याने पूर्णपणे घट्ट होईपर्यंत ढवळत राहा.

पूर्णपणे घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. मिश्रण थंड होईपर्यंत एक मोठे ताट घ्या. त्यानंतर ताटाच्या उलट्या बाजूस खांडवीचे पीठ हाताच्या साहाय्याने पसरवा. नीट पसरवलेले पीठ थोडावेळ थंड होऊ द्या.

पसरवलेल्या पीठाला सुरीच्या साहाय्याने लांब कापून घ्या. कापून झाल्यावर पीठाच्या पट्टयांना हाताच्या साहाय्याने रोल करत तयार करुन घ्या. त्यानंतर सर्व रोल अशा पद्धतीने तयार करुन घ्या. हे सर्व झाल्यावर एका बाजूला फोडणीची तयारी सुरु करा. फोडणीसाठी सर्वात आधी गॅस ऑन करुन त्यावर कढई ठेवा. त्यानंतर कढईमध्ये तेल अॅड करा.

गरम झालेल्या तेलामध्ये मोहरी, तीळ आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची अॅड करा. फोडणीच्या सर्व मिश्रणाला नीट मिक्स करुन घ्या. त्यानंतर गॅस ऑफ करुन फोडणीचे सर्व मिश्रण तयार केलेल्या खांडवीच्या रोल्स वर टाका. यानंतर सजावटीसाठी वरुन किसलेले खोबरे, बारीक चिरलेली कोथिंबीर अॅड करा. अशा पध्दतीने तुमची चविष्ट खांडवी तयार झाली आहे. गुजराती स्टाइल खांडवीला तुम्ही कोथिंबीर चटणीसोबत सर्व्ह करु शकता.

Khandvi Recipe in Marathi
Bhakarwadi Recipe : चितळे स्टाईल अस्सल मऊ आणि खुसखुशीत बाकरवडीची रेसिपी; स्वाद चाखताच म्हणाल वाहा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com