Idli Dosa Cooking Tips
Cooking TipsSaam TV

Cooking Tips : अर्रर्र! इडली डोसाचं पीठ जास्त आंबलं? फेकून देऊ नका, 'या' टिप्सने आंबटपणा कमी होईल

Idli Dosa Cooking Tips : पिठात काही गोष्टी मिक्स केल्यास त्याचा आंबटपणा कमी होतो हे तुम्हाला माहिती आहे का? माहिती नसेल तर या पुढील टिप्स वाचा.
Published on

हेल्दी ब्रेकफास्ट म्हटलं की प्रत्येकाला साऊथ इंडियन डिशची आठवण येते. इडली आणि डोसाचे पीठ आधी बनवून ठेवले की, सकाळी घाईच्या वेळेत सुद्धा त्याचे झटपट डोसे बनवता येतात. तुम्ही सुद्धा घरी हमखास हा नाश्ता बनवत असाल.

Idli Dosa Cooking Tips
Cooking Tips: कडू कारलं होईल गोड, या टिप्स फॉलो करा

मात्र काहीवेळा असे होते की पीठ अचानक जास्त आंबते आणि त्याची आंबट चव लागते. अशावेळी बऱ्याच महिला हे पीठ फेकून देतात. मात्र असे न करता तुम्ही पिठात काही गोष्टी मिक्स केल्यास त्याचा आंबटपणा कमी होतो हे तुम्हाला माहिती आहे का? माहिती नसेल तर या पुढील टिप्स वाचा.

नारळाचे दूध

एक ओला नारळ घ्या. नारळ मस्त बारीक किसून द्या. नारळ किसून झाला की त्यात थोडं दूध मिक्स करा आणि पाणी मिक्स करा. पुढे एका सूती कापडाने हे गाळून घ्या. हे दूध आंबलेल्या पिठात मिक्स करा.

अद्रक आणि मिरची

आंबलेलं पीठ नीट लागावं म्हणून तुम्ही अद्राक आणि मिरचीची पेस्ट करून घ्या. ही पेस्ट सुद्धा पिठात मिक्स केल्याने याचा आंबटपणा कमी होतो.

तांदळाचे पीठ

इडली आणि डोसाचे आंबलेले पीठ चवीला छान लागावे म्हणून यात तांदळाचे पीठ मिक्स करा. तांदळाच्या पीठाने यातील आंबटपणा कमी होतो. तसेच चव देखील अगदी रुचकर लागते.

विविध भाज्या

जास्त आंबलेलं पीठ नीट लागावं यासाठी त्यात शिमला मिरची, अद्रक, लसूण पेस्ट, मोड आलेली मटकी मिक्स करा. तसेच थोडे मीठ सुद्धा मिक्स करा. याने सुद्धा इडली आणि डोसा फार चविष्ट लागतो.

या काही सिंपल टिप्स वापरल्याने तुम्हाला पीठ फेकून देण्याची गरज नाही. पीठ फेकून न देता तुम्ही त्याचा आंबटपणा या टीप्सने कमी करू शकता.

Idli Dosa Cooking Tips
Cooking Tips : पुऱ्या तळल्यानंतर उरलेले तेल वापरण्याआधी करा शुद्ध, नाहीतर...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com