Cooking Tips : पुऱ्या तळल्यानंतर उरलेले तेल वापरण्याआधी करा शुद्ध, नाहीतर...

Tips To Clean Frying Oil : पुऱ्या किंवा भजी तळल्यावर उरलेले तेल वापरण्याअगोदर फिल्टर करणे महत्वाचे आहे. उरलेले तेल असेच वापरल्यास हृदयाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.
Tips To Clean Frying Oi
Cooking TipsSAAM TV
Published On

स्वयंपाक करताना असे अनेकदा होते की, आपण एखादा पदार्थ तळण्यासाठी तेल काढतो आणि पदार्थ तळून झाल्यावर तेच तेल इतर पदार्थ बनवण्यासाठी वापरतो. असे करणे चुकीचे नाही. पण उरलेले तेल पुन्हा वापरण्यासाठी ते वापरण्या योग्य करणे गरजेचे असते. गरम तेलात फॅट असते. जे आरोग्यास धोकादायक ठरते. त्यामुळे जास्त कॅलरीज वाढतात. परिणामी वजन वाढण्याचा धोका उद्भवतो. तसेच खराब तेलामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढून हृदयाचे आरोग्य धोक्यात येते.

तळल्यानंतर उरलेले तेल कसे स्वच्छ करावे?

तेल गाळून घ्या

तेल वापरून झाल्यावर थंड करून गाळून घ्यावे. त्यामुळे तेलातील जळलेला अतिरिक्त भाग निघून जातो. कारण हे कण असलेले तेल पुन्हा वापरल्यास दुसरे अन्न पदार्थ जळू शकतात.

लिंबू

कढईत उरलेल्या तेलात लिंबाचे लहान तुकडे घाला. यामुळे लिंबाला तेलातील काळे कण चिकटतील. त्यानंतर ते गाळून पुन्हा वापरू शकता.

कॉर्न स्टार्च

उरलेले तेल गाळण्यासाठी तेलामध्ये कॉर्न-स्टार्च मिक्स करून ढवळत रहा. १० ते १५ मिनिटानंतर घट्ट झालेले तेल गाळून घ्या.

Tips To Clean Frying Oi
Brinjal Benefits : नावडती वांग्याची भाजी आरोग्यासाठी एकदम बेस्ट! फायदे वाचून थक्क व्हाल

उरलेल्या तेलाची काळजी

वापरलेल्या तेलाची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे उरलेले तेल गाळून झाल्यावर ओलावा आणि जास्त उष्णतेमध्ये ठेवू नका. यामुळे तेल लवकर खराब होते. तेल साफ केल्यानंतर ते कधीही हवा बंद बॉटलमध्ये ठेवावे. यामुळे तेलाची गुणवत्ता खराब होत नाही.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Tips To Clean Frying Oi
Tomato Dosa Recipe : पीठ न आंबवता पौष्टिक डोसा आता मिनिटांत तयार होणार; कसं? तुम्हीच वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com