Manasvi Choudhary
कारले चवीला कडू असल्याने ते खायला अनेकजण नाही म्हणतात.
आरोग्याच्या दृष्टीने कारल्याची भाजी फायदेशीर मानली जाते.
कारले योग्य पध्दतीने बनवल्यास कडू कारलेही लोक आवडीने खातील.
कारल्याची भाजी बनवण्याआधी ३० मिनिटे मीठ लावून ठेवा.
मिठाच्या पाण्यात कारले भिजवून ठेवल्याने त्यातील कडूपणा कमी होतो.
कारल्याची भाजी बनविण्याआधी दही लावल्याने कारल्यातील कडूपणा कमी होतो.
कारल्याच्या बियांमध्ये कडूपणा असतो यामुळे कारले कापताना त्याच्या बिया काढून टाका.
कारले बनविण्यापूर्वी त्याची साल काढावी. तसेच कारले उन्हात सुकवल्याने त्यातील कडवटपणा कमी होतो.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या
NEXT: Bitter Gourd Juice: फक्त मधुमेहच नाही; तर कारल्याच्या रसामुळे 'या' समस्याही होतील छू मंतर