Anant Chaturdasi 2024 : विसर्जन करण्याआधी बाप्पाला दाखवा मखाना खिरीचा नैवेद्य; वाचा रेसिपी

Anant Chaturdasi Special Recipe : बाप्पाचं विसर्जन करण्याआधी घरी बनवा मखाना खिर. गणरायाला नैवेद्यात सुद्धा ही खिर तुम्ही दाखवू शकता.
Anant Chaturdasi Special Recipe
Anant Chaturdasi 2024Saam TV
Published On

आज सर्वत्र गणेश चतुर्दशी आहे. प्रत्येक व्यक्ती आज पाणावलेल्या डोळ्यांनी आणि वाजत गाजत गणरायाला निरोप देणार आहे. आज घरोघरी आणि मोठ मोठ्या मंडळात विराजमान झालेले बाप्पा आपल्या घरी पुन्हा परतणार आहेत. गणरायाला निरोप देताना त्यासाठी शेवटचा नैवेद्य बनवला जातो. आज तुम्ही या नैवेद्यात बाप्पासाठी मखाना खीर बनवू शकता.

मखाना खिर बनवणे फार सोपं आहे. त्यासाठी साहित्य देखील कमी लागतं. तसेच तुम्ही बाप्पाच्या विसर्जनासाठी घरी आलेल्या पाहुण्यांना सुद्धा गोड म्हणून प्रसादामध्ये ही खिर देऊ शकता. चला तर मग मखाना खिर बनवण्याची सिंपल रेसिपी जाणून घेऊ.

Anant Chaturdasi Special Recipe
Makhana Benefits : रोज मखाणा खा, अनेक आजार दूर पळवा!

साहित्य

मखाना - १ कप

साखर - २ कप

वेलची पावडर - १/२ कप

बदाम - १० ते १२ तुकडे

पिस्ता - १० ते १२

केसर- ५ धागे

कृती

मखाना खिर बनवताना सर्वात आधी मखाना एका वाटीत पाणी घेऊन त्यात भिजत ठेवा. मखाना भिजल्यावर एका पॅनमध्ये मस्त भाजून घ्या. मखाना भाजताना गॅस कमी ठेवा. फास्ट गॅसवर मखाना भाजू नका. मखानाला गोल्डन ब्राउन रंग येईपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर पुढे सर्व मखाना काढून घ्या. मखाना थंड होण्याची वाट पाहा. मखाना थंड झाल्यावर मिक्सरच्या एका भांड्यात काढून घ्या. त्यानंतर मखाना मस्त बारीक करून घ्या.

मखाना छान बारीक झाल्यावर एका भांड्यात दूध गरम करण्यासाठी ठेवा. दूध गरम होत असताना ते सतत एका चमच्याच्या सहाय्याने हलवून घ्या. दूध गरम करताना देखील गॅस फास्ट ठेवू नका. आपल्याला दूध गरम करताना ते आटवून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने दूध गरम केल्याने दुधाला छान टेक्सचर आणि जाड मलाई येते. त्यामुळे खिर आणखी जास्त चवदार लागते.

पुढे दूध गरम झाल्यावर सर्व ड्रायफ्रूट्स बारीक करून तुपात भाजून घ्या आणि तयार दुधात मिक्स करा. दुधामध्ये पुढे मखाना देखील टाकून घ्या. यानंतर यात वेलची पूड मिक्स करा. तसेच शेवटी साखर आणि केसर सुद्धा मिक्स करा. याने दुधाला सुंदर रंग येतो. एक उकळी घेतल्यानंतर गॅस बंद करा. तयार झाली तुमची मखाना खिर. ही खिर तुम्ही आज गणरायाला निरोप देताना आधी प्रसाद म्हणून दाखवू शकता.

Anant Chaturdasi Special Recipe
Makhana Side Effects: मखाना खाणं आरोग्यासाठी धोक्याचं?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com