कोमल दामुद्रे
मखाण्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, फॅट, मिनरल्स, फॉस्फरस, सोडियम असते. त्यामुळे याचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते.
रोज मखाणे खाल्ल्याने आरोग्याला कसा फायदा होतो जाणून घेऊया.
मखाणे हे अँटी-एजिंग फूडसारखे काम करते. मखाण्यामध्ये केम्पफेरॉल नावाचे घटक असतात. जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात.
रोज मखाणे खाल्ल्याने चयापचय क्रिया सुधारते. यामुळे वजन कमी होते.
मखाण्यामध्ये सोडियम आणि सॅच्युरेटेड फॅट कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. याचे सेवन केल्याने कोलेस्टेरॉल नियंत्रित राहाते.
जर तुम्हाला मानसिक ताण येत असेल तर रोज झोपण्यापूर्वी ५ मखाणे खा.
यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण कमी असते. याच्या सेवनाने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहाते.