Special Vari Tandul Kheer :
नवरात्रीचे उपवास सुरु झाले असून अनेक भाविकांचा या काळात उपवास असतो. नवदुर्गेच्या पूजेसोबत तिची कृपा आपल्यावर राहावी असे प्रत्येकाला वाटते. या दिवसात शरीराला पोषक आहार मिळावा असे प्रत्येकाला वाटते.
उपवासात अधिक पोषकतत्व मिळावे यासाठी सर्वानीच निरोगी पदार्थ खायला हवे. उपवासात तुम्हालाही तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर आम्ही तुम्हाला सोपी अशी रेसिपी सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे पोटही भरलेले राहिल आणि भुकही लागणार नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
1. साहित्य | Ingredients
वरईची/भगरची खीर रेसिपी | Varai/Bhagar Kheer Recipe
• साजूक तूप २ चमचे | Ghee 2 tsp
• वरई १/४ कप | Varai ¼ cup
• पाणी (Water) १/२ कप | Water ½ cup
• साखर (Sugar) १/४ कप |Sugar ¼ cup
• खोवलेला ओला नारळ २ मोठे चमचे | Desiccated Coconut 2 tbsp
• दूध (Milk) २ कप | Milk 2 cup
• वेलची पूड | Cardamom Powder
• सुका मेवा | Dry Fruits
2. कृती
खीर बनवण्यासाठी वरई भिजवून त्यातील पाणी काढून घ्या.
नंतर पातेल्यात तूप घालून त्यात भिजवलेला वरई घाला.
तूपात वरई चांगल्या पद्धतीने भाजून घ्या नंतर त्यात ओल्या नारळाचा किस घाला. पुन्हा परतवून घ्या.
त्यानंतर त्यात साखर आणि पाणी घालून मिश्रण चांगले मिक्स करा आणि वाफ येऊ द्या
मिश्रणाला उकळी आल्यानंतर त्यात वरुन दूध घाला. चिमुटभर केसर घालून पुन्हा ढवळून घ्या.
तयार सारण घट्ट झाल्यानंतर वरुन वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्स घालून पुन्हा ढवळून घ्या.
तयार आहे गरमागरम अशी वरईची खीर.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.