रोज रोज घरातील आणि बाहेरील काम करुन महिलेची तारेवरची कसरत होते. घरी जाऊन पुन्हा काय बनवायचे हा प्रश्न. त्यात तेच तेच पदार्थ खाऊनही वैताग येतो.
जर तुम्हालाही स्वयंपाक करण्याचा कंटाळा आला असेल आणि हलके फुलके काही खायचे असेल तर दलिया मसाला खिचडी ट्राय करु शकता. चवीला भारी पण मऊसुत रेसिपी कशी बनवायची पाहूया.
1. साहित्य
गव्हाचा दलिया १ कप | Wheat Daliya 1 cup
तेल २ चमचे | Oil 2 tsp
हिंग १/४ चमचे | Asafetida ¼ tsp
चिरलेली हिरवी मिरची २ ते ३ | Green Chilly with Straight Cut 2 to 3
उभा पातळ चिरलेला कांदा १ मोठा | Sliced Onion 1 big
बारीक चिरलेला टोमॅटो २ मोठे | Finely chopped Tomato 2 big
गाजर जाड लांब १ इंच १ लहान | Carrot long thick 1 inch size chopped 1 small
सिमला मिरची चौकोनी १ इंच १ लहान | Green Capsicum Square 1 inch size chopped 1 small
मटार १/२ कप | Green Peas ½ cup
बटाटा जाड लांब १ इंच १ लहान | Potato long thick 1 inch 1 small
मिरची पावडर १/२ चमचा | Red Chilly Powder ½ tsp
हळद १/२ चमचा | Turmeric Powder ½ tsp
पाणी गरम ४ कप | Hot Water 4 cup
मीठ | Salt
गरम मसाला १/२ चमचा | Garam Masala ½ tsp
बारीक चिरलेली कोथिंबीर | Finely Chopped Fresh Coriander
तूप २ चमचे तडका साठी | Ghee 2 tsp for Tadaka
जिरे १/२ चमचा तडका साठी | Cumin Seeds ½ tsp for Tadaka
2. कृती
दलिया धुवून गाळून घ्या. नंतर ते कढईत भाजून घ्या.
कढईत तेल, हिंग, कांदा, हिरवी मिरची घालून चांगले परतावे.
नंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतावे.
हळद, तिखट, सर्व भाज्या घालून परतावे.
नंतर त्यात डाळी, गरम पाणी, मीठ घाला. हे झाकण ठेवून शिजवा.
यामध्ये गरम मसाला आणि कोथिंबीर घाला.
फोडणीसाठी तूप आणि जिरे घाला.
तयार होईल गरमा गरम दलिया मसाला खिचडी.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.