Good News: आनंदाची बातमी! कल्याण-डोंबिवलीला मिळणार 4 पदरी उड्डाणपूल, वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार; कुठे बांधला जाणार?

Good News for Kalyan Dombivli Commuters: कल्याण-डोंबिवलीकरांचा प्रवास लवकरच सुसाट होणार आहे. कल्याण-डोंबिवलीकरांना ४ पदरी नवा उड्डाणपूल मिळणार आहे. कुणाला फायदा होणार वाचा सविस्तर...
Good News: आनंदाची बातमी! कल्याण-डोंबिवलीला मिळणार 4 पदरी उड्डाणपूल, वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार; कुठे बांधला जाणार?
Good News for Kalyan Dombivli CommutersSaam Tv
Published On: 
  • कल्याण-डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी

  • मोठागाव रेल्वे क्रॉसिंगवर चार पदरी उड्डाणपूल

  • कल्याण डोंबिवलीकरांसाठी नवीन उड्डाणपुलाची मंजुरी

  • डोंबिवली मोठागाव पुलाच्या कामाला गती मिळाली

संघर्ष गांगुर्डे, डोंबिवली

कल्याण-डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी आहे. कल्याण-डोंबिवलीला नवा चार पदरी उड्डाणपूल मिळणार आहे. कल्याण-डोंबिवलीच्या दळणवळण व्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मोठागाव रेल्वे क्रॉसिंगवरील चार पदरी रेल्वे ओव्हर ब्रिजच्या प्रस्तावाला आज स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाली. या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीचा मार्ग मोकळा झाला असून संपूर्ण डोंबिवलीच्या वाहतूक व्यवस्थेला दिलासा देणाऱ्या एका महत्त्वपूर्ण प्रकल्पाला गती मिळाली आहे.

मोठागाव रेल्वे क्रॉसिंगवरील पुलाची संकल्पना सर्वप्रथम २००७ मध्ये तत्कालीन माजी महापौर पुंडलिक म्हात्रे यांनी मांडली होती. महापौरपदाच्या कार्यकाळात त्यांनी या रेल्वे ओव्हर ब्रिजचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. त्यावेळी राज्य सरकारकडून या प्रकल्पासाठी २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर केंद्र सरकारच्या DFCCIL प्रकल्पाचे काम सुरू झाल्यामुळे मोठागाव पुलाच्या कामाला स्थगिती मिळाली. सुरुवातीला हा पूल सिंगल लेन स्वरूपात उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते.

२०१३ पासून दिपेश पुंडलिक म्हात्रे यांनी या पुलासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू केला. भविष्यातील वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या आणि डोंबिवलीतील वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता सिंगल लेन पूल हा कायमस्वरूपी उपाय ठरणार नाही, अशी त्यांची ठाम भूमिका होती. त्यामुळे सिंगल लेन पुलाच्या प्रस्तावाला विरोध करून त्यांनी चार पदरी उड्डाणपूल उभारण्याची मागणी सातत्याने लावून धरली. नागरिकांना भविष्यात पुन्हा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये, या दूरदृष्टीतून त्यांनी चार पदरी पुलासाठी संघर्ष केला.

Good News: आनंदाची बातमी! कल्याण-डोंबिवलीला मिळणार 4 पदरी उड्डाणपूल, वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार; कुठे बांधला जाणार?
Pune Double Metro Flyover: पुण्यात डब्बल डेकर उड्डाणपूल; मेट्रो-कार एकाचवेळी धावणार, पुणेकरांची वाहतूककोंडी फुटणार, वाचा वैशिष्ट्य

मोठागाव रेल्वे क्रॉसिंगवरील हा चार पदरी उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर त्याचा फायदा केवळ मोठागाव परिसरापुरता मर्यादित राहणार नाही, तर संपूर्ण डोंबिवलीच्या वाहतूक व्यवस्थेला त्याचा मोठा फायदा होणार आहे. मानकोली पूल सुरू झाल्यानंतर डोंबिवली परिसरातील वाहतुकीच्या स्वरूपात मोठे बदल झाले असून मोठागाव रेल्वे क्रॉसिंगवर वाहनांचा ताण वाढला आहे. या पार्श्वभूमीवर चार पदरी उड्डाणपूल उभारल्यामुळे मोठागाव, माणकोली, डोंबिवली पूर्व-पश्चिम तसेच आसपासच्या परिसरातील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

Good News: आनंदाची बातमी! कल्याण-डोंबिवलीला मिळणार 4 पदरी उड्डाणपूल, वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार; कुठे बांधला जाणार?
Byculla-Mazgaon Flyover: भायखळा ते CSMT फक्त १० मिनिटांत; दोन नवीन उड्डाणपूल बांधणार; कसा असणार मार्ग?

दररोज कामानिमित्त प्रवास करणारे नोकरदार, विद्यार्थी, व्यावसायिक, महिला आणि सर्वसामान्य वाहनचालक यांचा प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होईल. नागरिकांचा वेळ वाचेल आणि डोंबिवलीच्या भविष्यातील वाढत्या वाहतुकीसाठी महत्त्वाची पायाभूत सुविधा उपलब्ध होईल. या पुलाचे काम लवकरात लवकर प्रत्यक्षात सुरू व्हावे, यासाठी पुढील प्रशासकीय कार्यवाही आणि आवश्यक मंजुऱ्यांचा पाठपुरावा सातत्याने करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Good News: आनंदाची बातमी! कल्याण-डोंबिवलीला मिळणार 4 पदरी उड्डाणपूल, वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार; कुठे बांधला जाणार?
Mumbai Flyover: मुंबईकरांचा प्रवास सुसाट! नवीन उड्डाणपूल लवकरच होणार सुरू, कुणाला होणार फायदा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.