Bharat Jadhav
फटाक्यांमुळे होणाऱ्या डोळ्यांच्या दुखापती या किरकोळ जळजळ आणि भाजण्यापासून ते दृष्टीवर कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतात.
दिवाळीचा उत्सव साजरा करताना डोळ्याची काळजी कशी घ्यायची याची माहिती डॉ. अग्रवालस् आय हॉस्पिटलच्या चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर आणि हेड ऑफ क्लिनिकल सर्व्हिसेस डॉ. वंदना जैन यांनी दिलीय.
धूर, धूळ किंवा राखेमुळे डोळ्यांना जळजळ होत असल्यास डोळे चोळू नका. त्यामुळे जळजळ वाढू शकते आणि डोळ्यांना अधिक इजा होऊ शकते.
डोळे किमान २० मिनिटे स्वच्छ पाण्याने धुवा. जळजळ कमी न झाल्यास वैद्यकीय सल्ला घ्या.
फटाके नेहमी मोकळ्या जागेत फोडावेत. योग्य संरक्षणात्मक साधने वापरावीत आणि फटाके हाताळल्यानंतर स्वच्छ पाण्याने हात धुवावेत. हात स्वच्छ धुतल्याशिवाय डोळ्यांना स्पर्श करू नका.
डोळ्यांत गेलेले कण किंवा बाह्य वस्तू स्वतः काढण्याचा प्रयत्न करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही मलम, आय ड्रॉप्स किंवा घरगुती उपाय वापरू नका.
डोळ्यांत काहीतरी घुसल्याची किंवा डोळ्याला छेद झाल्याची शंका असल्यास डोळे धुवू नका किंवा त्यावर दाब देऊ नका. डोळ्यावर कोणताही दाब न देता कठीण संरक्षक कवच ठेवून तातडीने आपत्कालीन वैद्यकीय मदत घ्या.
फटाक्यांच्या अपघातानंतर वेदना, लालसरपणा, धूसर दिसणे, प्रकाश सहन न होणे किंवा डोळ्यांतून सतत पाणी येणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित नेत्रतज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावी.