Chandraghanta Devi Saam Tv
लाईफस्टाईल

Chandraghanta Devi: नवरात्रीचा तिसरा दिवस चंद्रघंटा देवीला समर्पित, 'या' मंत्राचा जप केल्याने मनातील इच्छा होतील पूर्ण

Navratri 3 Day Chandraghanta Devi Puja: नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. ‘ॐ देवी चंद्रघंटायै नमः’ मंत्राचा जप केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

Manasvi Choudhary

नवरात्रीचा आज तिसरा दिवस आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. चंद्रघंटा देवीची पूजा केल्याने घरात आनंद आणि सुख- समृद्धी येते. नवरात्रीचा तिसरा दिवस दुर्गेचे तिसरे रूप चंद्रघंटा देवीला समर्पित आहे. या दिवशी चंद्रघंटा देवी पूजा केली जाते. देवी चंद्रघंटा यांच्या मस्तकावर घंटा आकारांचा अर्धचंद्र आहे यामुळे सर्व भक्त चंद्रघंटा म्हणून ओळखतात. नवरात्रीच्या पूजेत तिसऱ्या दिवशीचे महत्व अधिक आहे. चंद्रघंटा देवीची पूजा, पद्धत जाणून घेऊया.

चंद्रघंटा देवीली सोनेरी किंवा पिवळे कपडे अर्पण करावे. देवीच्या चरणी पांढऱ्या कमळाच्या किंवा पिवळ्या गुलाबाच्या माळा अर्पण केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

देवी चंद्रघंटाची पूजा कशी करावी?

ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करा आणि स्वच्छ वस्त्र परिधान करा.

देवीच्या पूजेच्या चरणी पिवळे फुल अर्पण करा.

देवीच्या नैवेद्यामध्ये केशराची खीर आणि दुधापासून बनवलेली मिठाई अर्पण करा.

चंद्रघंटा देवीची आरती करताना “ॐ देवी चंद्रघंटायै नमः” मंत्राचा जप करावा.

मंत्राचा जप केल्याने भक्तांवर देवी चंद्रघंटा देवीचा आशीर्वाद मिळतो आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT