
नवरात्री हा अत्यंत पवित्र सण मानला जातो. आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रीला देवीच्या नऊ विविध रूपांची पूजा केली जाते. नवरात्र हा सण केवळ धार्मिक सण नसून अध्यात्मिक आणि मानसिक प्रगतीसाठी चांगला आहे. नवरात्रोत्सवात काही वस्तू खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जाते ज्यामुळे घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते.
हिंदू धर्मातील हा पवित्र सण मोठ्या उत्साहात साजरा होईल. देवीच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण होतात. हिंदू धर्मामध्ये देवी लक्ष्मी धन, समृद्धी आणि कल्याणाची देवी मानली जाते.
श्रृगांर
नवरात्रीमध्ये श्रृगांराला विशेष महत्व आहे. देवीला श्रृगांर प्रिय असल्याने नवरात्रीत श्रृगांर खरेदी करणं शुभ मानलं जाते. यामुळे घरात समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते.
देवीची मूर्ती
या पवित्र सणादरम्यान घरात देवतेची मूर्ती आणणे अत्यंत शुभ मानलं जाते. देवीची मूर्ती घरी आणल्याने शुभ असते. यामुळे मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.
झाडे लावा
नवरात्री सणादरम्यान तुळशी, शमी, केळी ही झाडे लावणे अत्यंत शुभ असेत. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.
कामधेनूची मूर्ती
नवरात्रीत कामधेनूची मूर्ती घरी आणल्याने धन आणि आरोग्य दोन्ही प्राप्त होतात घरी कामधेनूची पूजा केल्याने आर्थिक अडचण दूर होते.
नवीन वाहन खरेदी करा
नवरात्रीत नवीन वाहन खरेदी करणे फायदेशीर असते. विशेषत: शनिवारी वाहन खरेदी केल्याने फायदेशीर असते.