Home Remedies For Get Rid Of Cockroaches  Saam tv
लाईफस्टाईल

Home Remedies : घराच्या किचनमध्ये खूप झुरळं झाली? फक्त 'हा' पदार्थ किचनमध्ये ठेवा

Home Remedies For Get Rid Of Cockroaches : घरातील किचन आणि कपाटाच्या कोपऱ्यात मोठ्या प्रमाणात झुरळे होतात. या झुरळांचा नायनाट करण्यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेऊयात.

Vishal Gangurde

घर कितीही स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवलं तरी झुरळांचा त्रास सहन करावा लागतो. खरंतर झुरळे अन्न आणि उष्णतेच्या शोधात घरात शिरतात. घरातील किचन, बाथरुम आणि कपाटाच्या कोपऱ्यात सहन झुरळं आढळतात. हीच झुरळे तुमच्या आरोग्यासाठीही धोकादायक ठरू शकतात. या झुरळामुळे अन्न दूषित होऊन पोटाचे आजारही होऊ शकतात. त्यामुळे घरातील झुरळांचा नायनाट करण्यासाठी उपाय करणे गरजेचे आहे.

बाजारात झुरळांचा नायनाट करणारी अनेक नाशक उत्पादने उपलब्ध आहेत. या नाशक उत्पादनातील रसायने आरोग्यसाठी घातक असू शकतात. त्यामुळे नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय शोधणे गरजेचे ठरते. घरातून झुरळांना हाकलण्यासाठी काही घरगुती तुम्हाला उपाय मदत करतील. उपाय नैसर्गिक असल्याने आरोग्यालाही कोणता धोका नाही.

बेकिंग सोडा आणि साखर

झुरळांचा नायनाट करण्यासाठी बेकिंग सोडा आणि साखर उपयोगी ठरतील. साखरेचा वास हा झुरळांना आकर्षित करतो. त्यामुळे बेकिंग सोडा झुरळांच्या शरीरात गेल्यावर त्यांना मारण्याचं काम करतो. त्यामुळे बेकिंग सोडा आणि साखर मिसळून झुरळे असणाऱ्या ठिकाणी टाकावे. झुरळांनी हे मिश्रण खाल्ल्यानंतर त्यांच्या शरीरात वायू निर्माण होऊन ते नष्ट होतात. दररोज हा उपाय केल्यास घरातील झुरळांची संख्या कमी होईल.

लसणाचा उपाय

लसूण हा किटनाशक मानला जातो. झुरळांना लसणाचा वास सहन होत नाही. यासाठी लसूण आणि पाणी एकत्र करून एकत्र करून त्याचा रस तयार करावा. हा रस झुरळ दिसणाऱ्या जागी फवारावा. लसणाचा उपाय झुरळे त्या ठिकाणाहून दूर पळतात. तसेच किचन आणि कपाटाच्या कोपऱ्यातही लसणाऱ्या पाकळ्या ठेवल्यास झुरळांचा त्रास कमी होण्याची शक्यता मोठी असते.

व्हिनेगर

व्हिनेगरचा उपयोग फायदेशीर ठरेल. व्हिनेगर प्रत्येक कामात उपयुक्त ठरते. व्हिनेगरने घर निर्जंतुक होऊ शकते. यासाठी आठवड्यातून तीन वेळा जेवण ठेवण्याच्या जागेवर व्हिनेगरचा स्प्रे करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Shocking : पुण्यात प्रेमीयुगुलाने जीवन संपवले, खडकवासला धरणाजवळ आढळले दोघांचे मृतदेह; परिसरात खळबळ

GK: वर्षात १२ महिने नसून १३ महिने असणारा 'हा' अनोखा देश कोणता?

Maharashtra Live News Update : विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Dhule Corporation School : महापालिकेच्या ६५ पैकी तब्बल ४५ मराठी शाळा बंद; धुळे शहरातील धक्कादायक वास्तव

Fashion Inspired By GenZ Actress: नव्या ट्रेंडसाठी या जेन झी अभिनेत्रींची फॅशन टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT