Panipuri Benefits Saam Tv
लाईफस्टाईल

Panipuri Benefits : आयुर्वेदिक पाणीपुरी खाल्ली आहे का ? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी मिळते...

Ayurvedic Panipuri : गाड्यांवर मिळणाऱ्या पाणीपुरी, तिथली अस्वच्छता, खराब पाणी व पाण्यात बोटं बुडवून दिलेल्या पुऱ्या यामुळे अनेकांना खाण्याची इच्छा होत नाही.

कोमल दामुद्रे

Ayurvedic Panipuri In Nashik : पाणीपुरी म्हटलं की, अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. त्याची चव आणि त्यात असणारे पदार्थ सगळ्यांच्या तोंडच पाणी पळवतात. मात्र गाड्यांवर मिळणाऱ्या पाणीपुरी, तिथली अस्वच्छता, खराब पाणी व पाण्यात बोटं बुडवून दिलेल्या पुऱ्या यामुळे अनेकांना खाण्याची इच्छा होत नाही.

अनेक समुद्रकिनारी, रस्त्यावर, स्ट्रीट फूड म्हणून प्रसिद्ध असणारी पाणी पुरी आपले अनेक आजार बरे करु शकते. हल्ली पुरीसोबत फक्त वटाणे नाही तर ती आणखी हेल्दी कशी होईल हे देखील पाहिले जाते. उघड्यावर मिळणारी पाणीपुरी ही अनेक आजारांना (Disease) निमंत्रण देते. मात्र अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करेल, अशी आयुर्वेदिक, हायजेनिक आणि चवदार पाणीपुरी तुम्हाला खायला मिळाली तर..

असाच एक प्रयोग नाशिकच्या दत्तू शेळकेंनी केला आहे. त्यांनी हा आयुर्वेदिक (Ayurvedic) पाणीपुरीचा हटके प्रयोग केला त्यांचे असे मत आहे की, ही पाणीपुरी खाल्ल्यास अनेक आजारांपासून दूर राहाता येईल.

नाशिकच्या राणे नगर परिसरातील खाऊगल्लीत मिळणारी ही आयुर्वेदिक पाणीपुरी.. दत्तू शेळके हे गेल्या पाच वर्षांपासून ही आयुर्वेदिक पाणीपुरी विकण्यास सुरुवात केलीय. पाणीपुरी हा सर्वांच्याचं आवडीचा पदार्थ असला, तरी अस्वच्छता आणि चांगल्या पाण्याच्या वापरा अभावी लोक पाणीपुरी खायला टाळाटाळ करतात.

त्यामुळे 'हायजीनिक' पाणीपुरी देण्याच्या उद्देशाने बाजारात मिळणारी पाणीपुरी आणि आपल्याला हवी असलेली हायजीनिक पाणीपुरी याचा त्यांनी दोन वर्षे अभ्यास केला. आयुर्वेदिक कंपनी असलेल्या मित्राच्या मदतीने आई आणि पत्नीच्या सल्ल्याने अशी 'बोट पुरी' त्यांनी तयार केली. यामध्ये पुदिना, कोथिंबीर, आलं, जिरं, लिंबू, तुळस, सोफ, आवळा, हरडा, हिंग, पिंपळी, लवंग अशा 42 नैसर्गिक पदार्थांचा वापर करून बनलेले शरीराला फायदेशीर ठरेल असे गोड आणि तिखट पाणी बनवण्यात त्यांना यश आलं.

येथील लोकांना झणझणीतपणा आवडतो अशा लोकांसाठी मिरचीचा ठेचा वापरलेली झोम्ब्लास्टिक पाणीपुरी डोळ्यात पाणी आणते. विशेष म्हणजे ही पाणीपुरी लॅब टेस्ट असून त्याचे सर्टिफिकेटही त्य़ांच्याकडे आहे.

सोबतच 'बोट पुरी' आणि त्यात वापरण्यात येणारे पाणी या दोघांचं पेटंटही त्यांनी घेतलंय. शिवाय अनेक आजारांना दूर ठेवेल, अशी ही पाणीपुरी असल्याचाही त्यांचा दावा आहे. गेल्या 22 वर्षांपासून पाणीपुरी आणि दाबेलीचा व्यवसाय (Business) करणाऱ्या नाशिकच्या दत्तू शेळके यांनी पाच वर्षांपासून आयुर्वेदिक पाणीपुरी विकतात.

दररोज पाणीपुरी तयार करतांना गोड आणि तिखट पाण्यासाठी ते 42 नैसर्गिक पदार्थांचा वापर करतात. हे सगळं करताना पाणीपुरीची टेस्ट बदलणार नाही याचीही ते कटाक्षाने काळजी घेतात. त्यामुळे त्यांच्या या पाणीपुरीची चव आणि हायजिन यामुळे ही आयुर्वेदिक पाणीपुरी नाशिककर खवय्यांच्याही पसंतीस उतरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकारकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप-सायकल फ्री? केंद्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी नवी योजना?

Maharashtra Live News Update: वाशिमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रचाराचे बॅनर,पोस्टर आणि फ्लेक्स काढले

बिबट्याच्या दहशतीतही रणरागिणी पुढे; चंद्रपुरात महिलांचा धाडसी निर्णय

मतदानाच्या आदल्यादिवशी EVMमध्ये छेडछाड? शिंदे सेनेच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

Eyebrow Shaping Tips: घरच्या घरी करा परफेक्ट आयब्रो! पार्लरशिवाय सुंदर शेप मिळवण्यासाठी 2 सोप्या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT