Nankhatai Recipe Saam TV
लाईफस्टाईल

Nankhatai Recipe : दिवाळी स्पेशल खुसखुशीत नानकटाई; 'या' टीप्सने बनवाल तर घरात सगळे कौतुक करतील

Nankhatai Make at Home : नानकटाई बनवताना सर्वात महत्त्वाचे असते प्रमाण. साहित्य घेताना तुम्ही ते किती प्रमाणात घेतले पाहिजे याचेच परफेक्ट माप आणि रेसिपी आज तुम्हाला सांगणार आहोत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिवाळीचं फराळ आता प्रत्येकाच्या घरी तयार आहे. यात काहींना फराळ अगदी उत्तम जमलं असेल तर काहींचं फराळ फसलं असेल. आता ज्यांना पुन्हा फराळ बनवण्याची गरज आहे त्यांच्यासाठी ही माहिती खास आहे. कारण आज आम्ही तुम्हाला घरी सोप्या पद्धतीने आणि खुसखुशीत नानकटाई कशी बनवायची याची माहिती सांगणार आहोत.

नानकटाई तुम्ही नुसती देखील खाऊ शकता. तसेच चहाबरोबर नानकटाई खाणे सर्वांनाच आवडते. मैद्यापासून बनवलेली नानकटाई दिवाळीत प्रत्येक घरात खाल्ली जाते. नानकटाई बनवताना सर्वात महत्त्वाचे असते प्रमाण. साहित्य घेताना तुम्ही ते किती प्रमाणात घेतले पाहिजे याचेच परफेक्ट रेसिपी आज तुम्हाला सांगणार आहोत.

अनेक महिला नानकटाई बनवतात तेव्हा पीठ अगदीच पातळ होते. किंवा नानकटाई जास्त करपते. त्यामुळे साहित्य आणि त्याचे प्रमाण योग्य असणे फार महत्त्वाचे आहे. चला तर मग साहित्यसह रेसिपी जाणून घेऊ.

साहित्य

तूप - अर्धा किलो

पिठी साखर - अर्धा किलो

मिठ - चवीनुसार

वेलची पूड - 1 चमचा

मैदा - 1 किलो

ड्रायफ्रूट - अर्धा पाव

कृती

सर्वात आधी एका मोठ्या परातीमध्ये तूप घ्या. तूप तुम्हाला फेटून घ्यायचं आहे. यासाठी तुम्ही यंत्राचा वापर करू शकता. तुमच्याकडे कोणताही यंत्र नसेल तर एका खोलगट वाटीच्या सहाय्याने तुम्हाला तूप अगदी अर्धा तास तरी फेटून घ्यावे लागेल. खूप छान फेटून घेतले की पुढे त्यामध्ये पिठीसाखर मिक्स करा.

जर तुमच्याकडे पिठीसाखर नसेल तर ती तुम्ही घरच्या घरी देखील तयार करू शकता. त्यासाठी बारीक साखर मिक्सरला बारीक करून घ्या. साखर अगदी पिठासारखे होईपर्यंत बारीक करून घ्यायची आहे. साखर छान बारीक झाली की फेटलेल्या तुपामध्ये मिक्स करा. त्यानंतर पुन्हा एकदा साखर आणि तूप तुम्हाला फेटून घ्यायचं आहे. फेटलेल्या तुपामध्ये साखर पूर्णतः एकजीव झाली पाहिजे.

पुढे या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ, वेलची पावडर आणि तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स टाकू शकता. तुम्ही यामध्येच फ्लेवरसाठी इसेन्सचा देखील वापर करू शकता. सर्व मिश्रण पुन्हा एकजीव करून घ्या. त्यानंतर शेवटी तुम्हाला यामध्ये मैदा मिक्स करायचा आहे. एकाच वेळी सर्व मैदा यामध्ये मिक्स करू नका.

मैदा मिक्स करताना तयार मिश्रणात जितके पीठ बसेल तितकाच ऍड करा. अशा पद्धतीने तुम्ही संपूर्ण पीठ मळून घेऊ शकता. पीठ अगदी छान रगडून घ्यावे. त्यानंतर तयार पिठाचे हातावर छोटे छोटे गोळे करून घ्या. तसेच या गोळ्यांना नानकटाईचा आकार द्या. गोल आडवे आणि उभे तसेच त्रिकोणी आकारात देखील तुम्ही नानकटाई बनवू शकता.

नानकटाई बनवून झाल्यानंतर तुमच्या घरी ओव्हन असल्यास त्यामध्ये ती भाजून घ्या. घरी ओवन नसेल तर तुमच्या परिसरात असलेल्या बेकरीमध्ये तुम्ही नानकटाई भाजू शकता. ओवन किंवा बेकरी दोन्हीमध्ये भाजलेली नानकटाई अत्यंत चविष्ट लागते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT