देशभरात दिवाळी सण हा मोठ्या थाटामाटात सुरु झाला आहे. या दरम्यान घरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा फराळ बनवला जातो. दिवाळीमध्ये फराळाबरोबर घराची आकर्षक सजावट देखील केली जाते. दिवाळी म्हटलं की फराळ हा आलाच. दिवाळीचा फराळ लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडतो. या दिवसांत फराळामध्ये लाडू, चकली, शंकरपाळ्या, करंजी असे विविध पदार्थ बनवले जातात. कधी कोणाला कुरकुरीत चकल्या आवडता, तर कोणाला तोंडात टाकताच विरघळणारे लाडू.
गोड हा पदार्थ सर्वांना आवडतो. तुम्ही बाजारात देखील मोती चूर लाडूचा आस्वाद घेतला असेल. पण घरच्या घरी मोतीचूर लाडू कसे बनवायचे असा प्रश्न सर्वांना पडतो. म्हणून आज तुम्हाला घरच्या घरी बनणाऱ्या मोतीचूर लाडूची रेसिपी सांगणार आहोत. मोतीचूर लाडू रेसिपी अगदी सोपी आहे. तुम्ही लगेच बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी.
साहित्य
चणाडाळ
साखर
पाणी
वेलची पावडर
खाण्याचा रंग
साजूक तूप
तळलेले काजू
तळण्यासाठी तेल/ तूप
बनवण्याची पद्धत
सर्व प्रथम चणाडाळ घ्या. यानंतर चणाडाळीला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. यानंतर त्या डाळीला पाण्यात टाकून दोन ते तीन तास भिजवून ठेवा. नंतर भिजवून ठेवलेल्या चणाडाळीचे पाणी काढून घ्या. नंतर त्या डाळीला मिक्सरच्या भांड्यात टाकून चांगले जाडसर असे दळून घ्या. यानंतर गॅस ऑन करुन घ्या. त्यानंतर त्यावर कढई ठेवून तेल टाका. तेल गरम झाल्यावर त्यात चणाडाळीचे बॅटर हाताच्या साहाय्याने एक एक करुन भजी सारखे टाका. या सर्व भजीना मंच आचेवर दोन्ही बाजूनीं तळून घ्या. अशा प्रकारे सर्व भजी तळून टिश्यू पेपरवर ठेवून घ्या.
यानंतर तळलेल्या भजी थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात ग्राईंड करुन घ्या. ग्राईंड केलेल्या भजीच्या मिश्रणाला एका भांड्यात काढून घ्या. दुसऱ्या बाजूला गॅस ऑन करुन घ्या. त्यावर एक पॅन ठेवा. मग त्यात आश्यकतेनुसार साखर, पाणी टाकून चांगला असा पाक तयार करुन घ्या. त्यानंतर त्यामध्ये वेलची पूड, खाण्याचा रंग अॅड करुन चांगले मिक्स करुन घ्या, आणि नंतर गॅस ऑफ करा.
यानंतर चणा डाळीचे ग्राईंड केलेले मिश्रण हळूहळू या साखरेच्या पाकात सोडा. नंतर या मिश्रणाला चांगले मिक्स करुन घ्या. यानंतर पुन्हा गॅस ऑन करुन घ्या, आणि मोतीचूर लाडूचे सर्व मिश्रण कोरडे होईपर्यंत चांगले मिक्स करुन गॅस ऑफ करुन घ्या. यानंतर या मिश्रमाला थोडा वेळ बाजूला ठेवून द्या. पुढच्या स्टेपमध्ये गॅस ऑन करुन थोड्याशा तुपात काजू फ्राय करुन घ्या. काजू फ्राय झाल्यावर तुम्ही मोती चूर लाडू वळायला घ्या. अशा प्रकारे सर्व लाडू तयार करुन घ्या. तुम्ही मोतीचूर लाडूना वरुन काजू लावून सर्व्ह करु शकता.