Shreya Maskar
मखाना कटलेट्स बनवण्यासाठी उकडलेला बटाटा, बडीशेप, शेंगदाण्याचा कूट आणि तूप इत्यादी साहित्य लागते.
मसाल्यांमध्ये तुम्ही गरम मसाला, लाल तिखट, मीठ, चाट मसाला, काळ मीठ इत्यादींचा वापर करावा.
मखाना कटलेट्स बनवण्यासाठी सर्वप्रथम मखाना छान तूपात भाजून घ्या.
मखाना थंड झाल्यावर ते बारीक क्रश करून घ्या.
आता एका बाऊलमध्ये क्रश मखाना, उकडलेला बटाटा, मीठ, गरम मसाला, चाट मसाला, कोथिंबीर, काळ मीठ आणि बडीशेप टाकून सर्व छान मिक्स करून घ्या.
या मिश्रणाचे तुम्हाला आवडेल त्या आकाराचे कटलेट्स तयार करून घ्या.
एका प्लानमध्ये तूप टाकून कटलेट खरपूस तळून घ्या.
पुदिन्याच्या चटणीसोबत खमंग मखाना कटलेट्सचा आस्वाद घ्या.