Shreya Maskar
सकाळी पोटभर आणि पौष्टिक नाश्ता कमी वेळात करायचा असेल तर, ओट्सची भेळ आवर्जून बनवा.
ओट्सची भेळ बनवण्यासाठी ओट्स, मखाना, मुरमुरे, फरसाण , तिखट, मीठ आणि चाट मसाला इत्यादी मसाले लागतात.
कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, काकडी, शिमला मिरची, कोबी इत्यादी भाज्या भेळ बनवण्यासाठी लागतात.
ओट्स भेळ बनवण्यासाठी सर्वप्रथम ओट्स तूपात भाजून घ्या.
ओट्समध्ये मखाना टाकून थोडा वेळ अजून परतून घ्या.
मखाना आणि ओट्स एका बाऊलमध्ये काढून त्यात मुरमुरे, फरसाण, कोथिंबीर आणि चिरलेल्या बाकीच्या भाज्या घाला.
चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि चाट मसाला घालून मिश्रण छान एकत्र करून घ्या.
भेळची चव अजून वाढवण्यासाठी त्यात उकडलेले बटाटे, पुरी, चिंच-पुदिन्याची चटणी घाला.