ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना पिझ्झा आवडत असतो.
सर्वांनीच बाजारात पिझ्झाचे विविध प्रकार ट्राय केले आहेत.
पण तुम्ही घरच्याघरी स्वतःच्या हाताने विविध प्रकारचे पिझ्झा तयार करु शकता.
ब्रेडचे स्लाईज,बटर,चिरलेला कांदा,चिरलेला टोमॅटो,चिरलेली सिमला मिरची,बेबी कॉर्न,चिरलेले मशरुम,पिझ्झा सॉस,टोमॅटो सॉस,ऑरेगॅनो,चिली फ्लेक्स,मोझेरोला चीझ,मीठ इत्यादी
सर्व प्रथम एक पॅन घ्या. त्यानंतर त्यात बटर टाकून कांदा,टॉमेटो आणि सिमला मिरची चांगले परतून घ्या.
यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पिझ्झा सॉस,ऑरेगॅनो, चिली फ्लेक्स आणि मीठ टाकून चांगले मिक्स करुन गॅस बंद करा.
हे सर्व झाल्यावर त्यानंतर एक तवा घ्या, आणि त्या तव्याला गॅस वर ठेऊन ब्रेडच्या एका स्लाईजला बटर लावून शेकवून घ्या.
यानंतर ब्रेडचा वरच्या बाजूस तयार केलेले पिझ्झाचे सर्व्ह मिश्रण टाका.
नंतर या मिश्रणावरुन हवे तेवढे मोझेरेला चीझ ऍड करुन पिझ्झाला ५ मिनिटे शिजवून घ्या,आणि नंतर गॅस बंद करा.
चीझ मेल्ट झालं की वरुन तुम्ही ऑरेगॅनो, चिली फ्लेक्स आणि सॉस टाकून पिझ्झा सर्व्ह करु शकता.
NEXT: दिवाळीत या ठिकाणी लाँग ट्रिप प्लान करा, जोडीदार होईल खूश